ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कटिबद्ध व्हा : के. कस्तुरीरंगन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:39 PM2019-02-26T17:39:14+5:302019-02-26T17:49:28+5:30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा एकविसावा दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला

Be committed to making the best contribution in all areas of knowledge: K. Muscular dosage | ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कटिबद्ध व्हा : के. कस्तुरीरंगन

ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कटिबद्ध व्हा : के. कस्तुरीरंगन

Next

नांदेड : विकास आणि वृद्धीच्या निर्णायक टप्प्यावर देश उभा आहे. तुमच्या पुढे आव्हाने आहेत. तथा संधी देखील आहेत. सातत्यपूर्ण शिक्षणातून स्वत:ला अद्यावत ठेऊन ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन  भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्त्रो) चे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा एकविसावा दीक्षान्त समारंभ आज, मंगळवारी विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी सुवर्णपदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींच्या असणाऱ्या लक्षणीय संख्येबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच अणुशक्ती, अवकाश, सरंक्षण आणि उद्योग या क्षेत्रात आपल्या देशाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. तथापी आरोग्य, पिण्याचे पाणी, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, पर्यावरण, संशोधन या क्षेत्रातील समस्या मात्र तशाच आहेत. त्या देखील प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि परवडणारे शोध लावण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी आपल्या भाषणात वर्षभरात विद्यापीठाने केलेल्या वाटचालीचा आढावा घेतला.   विद्यापीठ परिक्षेत्रातील औंढा येथे राष्ट्रीय सहभागासह अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने खगोलशास्त्राशी संबंधित अतिप्रगत अशी गुरुत्वीय तरंग शोध प्रयोगशाळा (लिगो) उभारण्याचे काम सुरु झाले असून या प्रयोगशाळेच्या उभारणीत विद्यापीठाचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे. किनवट येथील आदिवासी संशोधन व अभ्यासकेंद्रात पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘ट्रायबल स्टडीज व सोशल वर्क’ हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती दिली. यावेळी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुवर्णपदक व प्रमाणपत्र व २७६ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.माधुरी देशपांडे आणि डॉ.पृथ्वीराज तौर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी मंचावर अधिष्ठाता डॉ. वामनराव जाधव, प्राचार्य डॉ.व्ही.के. भोसले, प्राचार्य डॉ.जे.एम. बिसेन, डॉ.वैजयंता पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हसबे, डॉ.माधव पाटील,डॉ.सुर्यकुमार सदावर्ते, डॉ.दीपक बच्चेवार, डॉ.अशोक टीपरसे, गोविंदराव घार, डॉ.महेश मगर, गजानन असोलेकर, डॉ.रमाकांत घाडगे, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, शिक्षण, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Be committed to making the best contribution in all areas of knowledge: K. Muscular dosage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.