नांदेडमध्ये एप्रिलच्या तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:44 AM2018-05-01T00:44:02+5:302018-05-01T00:44:02+5:30

घराबाहेर जावे तर उन्हाच्या झळा, घरात थांबावे तरी घामाच्या धारा, कुलर अन् बर्फाने दिलासा मिळेना अन् उष्णतेच्या तडाख्यामुळे क्षणभर चैन पडेना ! पहिल्या पंधरवाड्यापर्यंत तुलनेने सुसह्य राहिलेल्या उन्हाळ्याचा सोमवारी नांदेडकरांना खरा तडाखा बसला़

April temperature high in Nanded | नांदेडमध्ये एप्रिलच्या तापमानाचा उच्चांक

नांदेडमध्ये एप्रिलच्या तापमानाचा उच्चांक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :घराबाहेर जावे तर उन्हाच्या झळा, घरात थांबावे तरी घामाच्या धारा, कुलर अन् बर्फाने दिलासा मिळेना अन् उष्णतेच्या तडाख्यामुळे क्षणभर चैन पडेना ! पहिल्या पंधरवाड्यापर्यंत तुलनेने सुसह्य राहिलेल्या उन्हाळ्याचा सोमवारी नांदेडकरांना खरा तडाखा बसला़ अगदी सकाळपासूनच टप्याटप्प्याने उकाडा वाढू लागला़ दुपारी ४ च्या सुमारास तर अक्षरश: गरम भट्टीजवळून चालतोय की काय असा अनुभव नांदेडकरांना आला़ एप्रिल महिन्याचा मागील पंधरा वर्षाचा उच्चांक आज तापमानाने गाठला होता़
यंदाचा उन्हाळा नांदेडकरासाठी असह्य होत असून दिवसेंदिवस तापमानात सातत्याने वाढ होत आहे़ यंदा एप्रिल महिन्यातील तापमानाचा गेल्या पंधरा वर्षाचा रेकॉर्ड मोडत ४४़५ अंशावर तापमान नोंदल्या गेले़ दिवसभर गरम वारे वाहत होते़ येत्या काही दिवसात त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषद हायस्कूलच्या हवामान विभागाचे प्रमुख बालासाहेब कच्छवे यांनी वर्तविली़
यंदा मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली होती़ परंतु एप्रिलमध्ये सुरुवातीपासून नांदेडचा पारा वाढतच गेला होता़ १४ एप्रिलपासून तर नांदेडचा पारा ४२ अंशावरच होता़ त्यानंतर १९ एप्रिलपासून नांदेडचे तापमान ४३़५ अंशावर होते़ २० एप्रिल- ४३, २१ एप्रिल- ४२़५, २२ एप्रिल-४२़५, २३ एप्रिल-४२, २४ एप्रिल-४३, २५ एप्रिल-४२़५, २६ एप्रिल-४३, २७ एप्रिल-४३़२ तर शुक्रवारी नांदेडच्या तापमानाने या वर्षातील उच्चांक गाठत ४४ अंशापर्यंत गेले होते़ शनिवार आणि रविवारही तापमानातील ही वाढ कायमच होती़ त्यात सोमवारी तापमानाने एप्रिल महिन्यातील मागील पंधरा वर्षाचा उच्चांक गाठला सोमवारी नांदेडचा पारा ४४़५ अंशावर नोंदविल्या गेला़ दरवर्षी साधारणता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नांदेडचे तापमान ४४ अंशावर जाते़ यंदा मात्र एप्रिलमध्येच पारा ४४़५ अंशावर पोहचल्यामुळे मे महिन्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे़
सोमवारी दिवसभर नांदेडसह जिल्ह्याभरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला़ सकाळी नऊ वाजेपासून उन्हाची दाहकता जाणवत आहे़ त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होऊन बसत आहे.

अशी घ्यावी काळजी
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून सकाळी ११ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे़ कपाळ, नाक, कान झाकणारा पांढºया रंगाचा रुमाल बांधावा़ डोळ्यावर गडद रंगाचा चष्मा़ दिवसभरात शरबत, दर तासाला पाणी, पाणीदार फळे खावीत़ फ्रिजमधील पाण्यामुळे उष्णता वाढते़ त्यामुळे माठातीलच पाणी प्यावे़ बर्फ खाऊ नये़वेदनाशामक औषधी घेवू नयेत़ रात्री झोपताना टॉवेल ओला करुन पोटावर ठेवावा़ त्यामुळे शरिरातील उष्णता कमी होईल़ उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे.ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. अशी माहिती फिटनेस तज्ज्ञ डॉ़अनिल पाटील यांनी दिली़

Web Title: April temperature high in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.