मृत्यूस कारणीभूत आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:06 AM2019-05-12T01:06:59+5:302019-05-12T01:08:10+5:30

आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़

The accused accused of death | मृत्यूस कारणीभूत आरोपी मोकाट

मृत्यूस कारणीभूत आरोपी मोकाट

Next
ठळक मुद्देकुंडलवाडी पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मयताच्या वडिलांची मागणी

बिलोली : आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़ कुंडलवाडी पोलिसांनी आरोपीला अद्यापही अटक केली नाही़ मयताच्या वडिलांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत़
३० एप्रिल रोजी रात्री डौर शिवारातील पुलाला गळफास घेवून प्रकाश बोडके यांनी आत्महत्या केली होती़ सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली़ खिशात सापडलेल्या नोट्समुळे आत्महत्येस कारण ठरल्यावरुन आरोपी अब्दुल खादर यांच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला होता़
मात्र याकडे पोलीस प्रशासनाकडून कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तसेच मी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते, त्याचा व्याज देण्यासाठी गेल्याने माझे १२ लाख रुपये घेऊन ये म्हणून अपमानात्मक शिवीगाळ व धकाबुक्की करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया येताळा येथील आरोपी अब्दुल खादर यास कुंडलवाडीचे सपोनि विनोद कांबळे आर्थिक तडजोडीतून आरोपीस बगल देत आहेत. गुन्ह्याचा तपास कांबळे यांच्याऐवजी दुसºयाकडे देऊन आम्हास न्याय मिळवून देण्याची तक्रार मयताचे वडील यशवंत मोगलप्पा बोडके यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे.
पोलीस म्हणाले आरोपीचा शोध चालू
मी स्वत: तपास करीत आहे व आरोपीच्या गावी येताळा येथे दोन वेळेस भेट दिली आहे.आरोपी हा फरार असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत. आरोपी सापडताच त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल - विनोद कांबळे, स.पो.नि. कुंडलवाडी

Web Title: The accused accused of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.