दहावीच्या परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल; विद्यार्थिनीने संपवले आयुष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 06:48 PM2024-02-10T18:48:39+5:302024-02-10T18:48:47+5:30

१ मार्चपासून सुरू होत आहेत दहावीच्या परीक्षा

A step away from the stress of 10th exams; The student ended her life | दहावीच्या परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल; विद्यार्थिनीने संपवले आयुष्य 

दहावीच्या परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल; विद्यार्थिनीने संपवले आयुष्य 

- शिवाजी राजूरकर
नांदेड:
इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आली असून अभ्यासाचा तणावातून एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात पंख्याला साडीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी सहापूर्वी नांदेडच्या जुना कौठा भागात उघडकीस आली आहे. 

नांदेडच्या जुना कौठा येथील शेतकरी बालाजी गोरे यांची मुलगी माधुरी गोरे इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. दरम्यान, १ मार्च पासून परीक्षा सुरू होणार आहेत. यामुळे अभ्यासाच्या तणावात माधुरी होती. यातूनच टोकाचा निर्णय घेत घरातील पंख्याला साडीने गळफास लावून माधुरीने आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार महेंद्र सवनकर व मदतनीस महिला अंमलदार पूनम उदगिरे यांनी दिली.

याप्रकरणी माधुरीचे वडील बालाजी हरीभाऊ गोरे यांनी दिलेल्या माहितीचेआधारे तूर्त नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोनि एन.एस. आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बी. ए. चव्हाण हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A step away from the stress of 10th exams; The student ended her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.