लेंडी प्रकल्पासाठी ७० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:32 AM2018-03-12T00:32:18+5:302018-03-12T00:32:27+5:30

राज्य सरकारने ९ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला़ त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्पातील बाधित १ हजार ३१० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ़ डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, मुक्रमाबाद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

70 million for the lendi project | लेंडी प्रकल्पासाठी ७० कोटी

लेंडी प्रकल्पासाठी ७० कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देमुखेड तालुका : १३१० बाधित कुटुंबांची ९३ कोटींची मागणी, मुक्रमाबादेत फटाके फोडून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड : राज्य सरकारने ९ मार्च रोजी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला़ त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्पातील बाधित १ हजार ३१० कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ७० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ़ डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, मुक्रमाबाद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
तालुक्यातील गोणेगाव येथील लेंडी नदीवर होऊ घातलेले लेंडी धरण विविध कारणांनी चर्चेत आहे़ मागील ३२ वर्षांपासून धरणाचे काम रखडल्याने १२ गावच्या बाधित कुटुंबांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गत ३० वर्षांपासून या भागाचा विकास खुंटला आहे. मुक्रमाबाद येथील १ हजार ३१० बाधित कुटुंबांनी ्रपुनर्वसन करण्यात यावे, यासाठी १२ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको केला होता. मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला; पण आ़ डॉ. तुषार राठोड यांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्ती करुन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व येणाºया ९० दिवसांत मावेजा मिळवून देणार अन्यथा स्वत: आमरण उपोषण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ त्याच मुद्यावर आ़ डॉ. राठोड यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व जलसपंदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे २०० कोटी रुपयांची मागणी केली होती़ या मागणीस मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
मागील अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये मंजूर झाले होते. मागील रक्कमेपैकी २० कोटी खर्च झालेले असून उर्वरित ३० कोटी अखर्चिक आहेत. तसेच या अर्थसंकल्पातील ७० कोटी व मागील ३० कोटी असे मिळून १०० कोटी रुपये लाभार्थ्यांच्या मावेजासाठी देणार असल्याचे सांगितले़ लाभार्थ्यांची मागणी ही ९३़४ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे सर्वांना मावेजा मिळेलच व उर्वरित रकमेत बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करुन नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. येत्या २ वर्षांत या लेंडी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी, महसूल विभाग प्रयत्न करणार आहे.
आजपर्यंतच्या इतिहासात ७० कोटी रुपयांची सर्वात मोठी तरतूद शासनाकडून करण्यात आली असून मागील काळातील २०१५ च्या अर्थसंकल्पात ३० कोटी, २०१६ च्या अर्थसंकल्पात २६ कोटी, २०१७ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी तर २०१८ च्या अर्थसंकल्पात ७० कोटी रुपये असे एकूण १७६ कोटी रुपये आणल्याचे आ़ डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले. मागील ३२ वर्षांच्या कालखंडात तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केवळ ३५० कोटी रुपये या प्रकल्पासाठी आणले होते. या धरणाचा एकूण खर्च १३९९़८ कोटी रुपये आहे़ तर राज्य सरकारचा या धरणाचा खर्च ६२ टक्के तर उर्वरित ३८ टक्के खर्च हा तेलंगणा राज्याने करावयाचा आहे.
दरम्यान, मुक्रमाबाद येथे शासनाकडून लेंडी प्रकल्पास मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याने आनंद साजरा करण्यात आला़ अनेकांनी फटाके फोडून जल्लोष केला़ मागील ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार असल्याने या भागातील विकासाचा मार्र्ग मोकळा झाला आहे़

Web Title: 70 million for the lendi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.