बंदुकीच्या धाकावर तरुणाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 01:14 AM2017-10-19T01:14:23+5:302017-10-19T01:14:34+5:30

रस्त्यावर वायर बांधून मोटरसायकलस्वाराला पाडले आणि त्याचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कन्हान नदीवरील साहोली पुलावर घडली.

Yunus kidnapped by a gunner | बंदुकीच्या धाकावर तरुणाचे अपहरण

बंदुकीच्या धाकावर तरुणाचे अपहरण

Next
ठळक मुद्देजखमी स्थितीत आढळला : बंदुकीसह, काडतूस, तलवार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा/ पारशिवनी : रस्त्यावर वायर बांधून मोटरसायकलस्वाराला पाडले आणि त्याचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कन्हान नदीवरील साहोली पुलावर घडली. त्यानंतर गुरुवारी तो तरुण जखमी स्थितीत साहोली शिवारात आढळला. या अपहरणाने पारशिवनी तालुक्यासह खापरखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.
राजू नामदेव पेंदाने (३१, रा. भानेगाव) असे जखमीचे नाव आहे. तो रेती पुरवठादार असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास तो पारशिवनीकडून खापरखेडाकडे एमएच-४०/४७८५ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान साहोली गावाजवळील कन्हान नदीच्या पुलावर दोन्ही बाजूने आरोपींनी अर्थिंग तार बांधलेली होती. राजू येताच त्यांनी तीे तार उचलली. त्यामुळे तो दुचाकीवरून खाली पडला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर झडप घालून त्याचे अपहरण केले. त्याच्या मोटरसायकलमागे त्याचा भाऊ भुजंग येत असताना त्याला राजूची मोटरसायकल पुलावर पडलेली दिसली. त्यामुळे त्याला संशय येताच त्याने पोलिसांना सूचना दिली. दोन दिवस तपास करूनही तो कुठेच आढळला नाही.
दरम्यान गुरुवारी भुजंगच्या गाडीत एका व्यक्तीने चिठ्ठी लिहून टाकली होती. त्यात आरोपीचे नाव होते. याबाबत भुजंगने पोलिसांना माहिती देऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सक्तीने विचारपूस केली असता त्याने अपहरणाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलीस राजूच्या शोधात निघाले असताना त्यांना राजू गंभीर जखमी स्थितीत साहोली शिवारात आढळला. त्याच्या छातीत बंदुकीची गोळी लागलेली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्याला कामठीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. या प्रकरणी पोलिसांनी साहोली येथील मंगेश बागडे याच्यासह आणखी दोघांना अटक केली. रेती व्यवसायातून हे अपहरण झाल्याची जोरदार चर्चा केली जात आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असून दोघे फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारशिवनी पोलीस आरोपींच्या मागावर आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.

Web Title: Yunus kidnapped by a gunner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.