‘पेन्शन’धारकांपासून का लपविली जातेय माहिती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 10:26 PM2018-10-09T22:26:00+5:302018-10-09T22:27:19+5:30

कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे निवृत्तीवेतनधारक मोठ्या विश्वासाने पाहत असतात. मात्र संघटनेच्या नागपूर कार्यालयाच्या कार्यप्रणालीमुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मासिक निवृत्तीवेतन वाढीसाठी कार्यालयाकडून अनेक निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ‘डिमांड नोट’ पाठविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात वाढीव निवृत्तीवेतन कधी सुरू होईल व थकबाकीची नेमकी किती रक्कम असेल याबाबत माहिती अधिकारातदेखील स्पष्ट माहिती देण्याचे टाळण्यात आले आहे.

Why information hidden from 'pension' holders? | ‘पेन्शन’धारकांपासून का लपविली जातेय माहिती ?

‘पेन्शन’धारकांपासून का लपविली जातेय माहिती ?

Next
ठळक मुद्दे‘पीएफ’ कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : मासिक ‘पेन्शन’वाढीसाठी ‘डिमांड नोट’मध्ये सविस्तर माहितीचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे निवृत्तीवेतनधारक मोठ्या विश्वासाने पाहत असतात. मात्र संघटनेच्या नागपूर कार्यालयाच्या कार्यप्रणालीमुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मासिक निवृत्तीवेतन वाढीसाठी कार्यालयाकडून अनेक निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ‘डिमांड नोट’ पाठविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात वाढीव निवृत्तीवेतन कधी सुरू होईल व थकबाकीची नेमकी किती रक्कम असेल याबाबत माहिती अधिकारातदेखील स्पष्ट माहिती देण्याचे टाळण्यात आले आहे.
मासिक निवृत्तीवेतनाच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे अनेक निवृत्तीवेतनधारकांना ‘डिमांड नोट’ पाठविण्यात आल्या होत्या. याअंतर्गत त्यांच्या सेवा कार्यकाळातील वेतनानुसार त्यांना वाढीव निधी कार्यालयाकडे भरण्याचे सांगण्यात आले. जर असे केले तर वाढीव निवृत्तीवेतन सुरू करण्यात येईल, अशी नोंद ‘डिमांड नोट’नमध्ये होती. त्यानुसार अनेक निवृत्तीवेतनधारकांनी अतिरिक्त रक्कम भरली. मात्र संबंधित रक्कम भरल्यानंतर मासिक निवृत्तीवेतन किती रुपयांनी वाढेल याची कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. यामुळे उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत याबाबत विचारणा केली. अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर मासिक निवृत्तीवेतनामध्ये किती वाढ होईल, हे निवृत्तीवेतन कधीपासून सुरू होईल तसेच निवृत्तीवेतनाची थकबाकी (अरिअर्स) किती कालावधीत मिळतील, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात कर्मचारी भविष्य निधी संघटनेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार निवृत्तीवेतनात किती वाढ होईल, याचे ठोस उत्तर देण्यात आले नाही. ‘डिमांड नोट’नुसार कार्यालयाला रक्कम प्राप्त झाल्यानंतर मासिक निवृत्तीवेतनाची गणना करण्यात येईल, असे तांत्रिक उत्तर देण्यात आले. सोबतच वाढीव निवृत्तीवेतन, थकबाकी नियमानुसारच मिळेल, असे उत्तर देण्यात आले. मात्र हे नियम काय आहेत, हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांमधील संभ्रम आणखी वाढला आहे.

ही निवृत्तीवेतनधारकांची थट्टा
अनेक निवृत्तीवेतनधारकांनी ‘डिमांड नोट’ आल्यानंतर तीन ते पाच लाख रुपयांची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडे भरली. मात्र माहितीच्या अधिकारातदेखील निवृत्तीवेतनधारकांना नेमकी माहिती देण्यात आली नाही. ज्येष्ठ नागरिकांना माहिती मिळविण्यासाठी कार्यालयाच्या इतक्या चकरा कापणे शक्य होत नाही. ही कार्यालयाकडून निवृत्तीवेतनधारकांची करण्यात आलेली थट्टा आहे का, असा प्रश्न अभय कोलारकर यांनी उपस्थित केला.

Web Title: Why information hidden from 'pension' holders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.