निरोप कसला माझा घेता...जेथे राघव तेथे सीता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 08:59 PM2019-04-17T20:59:13+5:302019-04-17T21:00:26+5:30

गीतरामायणाचे शिल्पकार ग. दी. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत गीतरामायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत रामेश्वरी येथील राम मंदिरात गीत रामायणाची एक मैफिल घेण्यात आली. दरम्यान, रसिकांनी निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता... यासारख्या अविट गोडीच्या गाण्यांचा आनंद लुटला.

Where is the message of mine ... where Raghav there Sita | निरोप कसला माझा घेता...जेथे राघव तेथे सीता

निरोप कसला माझा घेता...जेथे राघव तेथे सीता

Next
ठळक मुद्देगीत रामायणाची सुरेल मैफिल : संस्कार भारतीचा संगीतमय कार्यक्रम

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : गीतरामायणाचे शिल्पकार ग. दी. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विदर्भातील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत गीतरामायण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत रामेश्वरी येथील राम मंदिरात गीत रामायणाची एक मैफिल घेण्यात आली. दरम्यान, रसिकांनी निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता... यासारख्या अविट गोडीच्या गाण्यांचा आनंद लुटला.
नुपुर संगीत व कला आराधना संस्थेच्या कलावंतांनी एकूण १६ गाणी सादर करून या महायज्ञात सुरेल समिधा वाहिली. रचना खांडेकर-पाठक यांनी स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती... हे पहिले पुष्प वाहिले. अभय पांडे यांनी दशरथा घे हे पायसदान... गीत समरसून गायले. राम जन्मला गं सखी राम जन्मला... गीत दीपाली जोगळेकर यांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर मिलिंद कोरटकर यांनी ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा..., करुणा दांडेकर यांनी रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले..., अभय पांडे यांनी आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे..., भाग्यश्री शिंगरु यांनी मज आणून द्या हो हरीण अयोध्या नाथा..., महेश मगरे यांनी थांब सुमंता थांबवी रे रथ..., पूजा पाठक यांनी प्रभो मज एकची वर द्यावा... तर, पुष्पा जोगे यांनी त्रिवार जयजयकार... हे गीत सादर केले.
नंदा सराफ व पद्मा रावळे यांनी सहगायनात साथ दिली. की-बोर्डवर हर्ष गडकरी, तबल्यावर रघुवीर पुराणिक व प्रभावत चन्ने, ताल वाद्यावर निधी रानडे व वेदिका जोगळेकर यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कांचन भालेकर यांनी संचालन केले. संहिता लेखन आशुतोष अडोणी यांचे होते तर, ज्येष्ठ ताल वादक गजानन रानडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Where is the message of mine ... where Raghav there Sita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.