उपराजधानीवर जलसंकट; काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:37 AM2018-11-17T10:37:30+5:302018-11-17T10:41:09+5:30

अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे.

Water crisis in Nagpur; use safely, adviced by Bawankule | उपराजधानीवर जलसंकट; काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांचा सल्ला

उपराजधानीवर जलसंकट; काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांचा सल्ला

Next
ठळक मुद्देशहरासाठी पेंचमधून १५५ दलघमी पाणीकन्हान-कोलार नदीवर बांधणार धरणसुरागोंदी-अंबाझरीतील पाण्याचाही विचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती अधिकच चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे जलसंकटाची परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पामध्ये महानगरपालिकेसाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण असून कळमेश्वर, पारशिवनी, रामटेक, नगरधन आदी शहरांसाठी पाणी पुरविण्यात येते. यावर्षी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यानुसार शहरासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक आहे. तसेच पाण्याचे इतर पर्यायही शोधले जात आहे, असे पालकमंत्री बावकुळे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकर देशमुख,आ. जोगेंद्र कवाडे, आ.डॉ. मिलिंद माने, आ.गिरीश व्यास, माजी आ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता एस.जी. ढवळे, जितेंद्र तुरखेडे तसेच सर्व नगर परिषद, नगर पंचायतचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. वाडी नगर परिषद तसेच डिफेन्ससाठी वेणा जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, विभागाने विद्यापीठाच्या विविध चमूतील खेळाडूंसाठी ब्लेझर, ट्रॅकसूट व स्पोर्ट कीटची खरेदी केली होती. नियमानुसार तीन लाखापर्यंत खरेदीचा अधिकार विभागाला असतो. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. निविदा मागविल्यानंतर सामानाच्या खरेदीसाठी कुलगुरुंची मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यात आले नाही. निविदा काढण्यापूर्वीच सामान मागविण्यात आले. विना मंजुरी घेता एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामानाचा पुरवठाही झाला आहे. बिलाला मंजुरी देण्यासाठी समितीसमोर ठेवण्यात आले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला. या बाबीची गंभीर दखल घेऊन समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. सोबतच विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना स्पष्टीकरण मागितले होते.

अपव्यय टाळण्यासाठी स्वतंत्र बैठक
शहरात आधीच पाणी कमी आहे. यातच पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. यावर बैठकीत बरीच चर्चा झाली. तेव्हा शहरात पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यव टाळण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले.

Web Title: Water crisis in Nagpur; use safely, adviced by Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.