जलसंवर्धनातून विदर्भाच्या कॅलिफोर्नियाला गत वैभव प्राप्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:40 PM2018-07-14T21:40:59+5:302018-07-14T21:43:09+5:30

मोर्शी-वरुड हा संत्र्याचा भाग कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. परंतु या भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जलसंवर्धनातून कॅलिफोर्नियाला गत वैभव प्राप्त होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. वरुड परिसर मित्र परिवार, नागपूरतर्फे आयोजित वरुड परिसर जीवनगौरव सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

Vidarbha's California will get great glory from water conservation | जलसंवर्धनातून विदर्भाच्या कॅलिफोर्नियाला गत वैभव प्राप्त होईल

जलसंवर्धनातून विदर्भाच्या कॅलिफोर्नियाला गत वैभव प्राप्त होईल

Next
ठळक मुद्देनितीन गडकरी : वरुड परिसर जीवनगौरव सन्मान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोर्शी-वरुड हा संत्र्याचा भाग कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. परंतु या भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जलसंवर्धनातून कॅलिफोर्नियाला गत वैभव प्राप्त होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. वरुड परिसर मित्र परिवार, नागपूरतर्फे आयोजित वरुड परिसर जीवनगौरव सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष महापौर नंदा जिचकार,माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार आशिष देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, सत्कारमूर्ती डॉ. राजू देशमुख, ज्येष्ठ रंगकर्मी मधुभय्या जोशी, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, माधव देशपांडे आदी उपस्थित होते.
वरुड-मोर्शी भागातील व्यक्तींनी केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून वरुड परिसर मित्र परिवारातर्फे ‘वरूड परिसर जीवनगौरव सन्मान’दिला जातो. २०१५ या वर्षाचा सन्मान डॉ. राजू देशमुख यांना, तर २०१७ चा सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी मधुभय्या जोशी यांना नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. २०१६ चा सन्मान डॉ. सुरेंद्र पाटील यांना जाहीर करण्यात आला. त्यांचे पुत्र समीर पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. नितीन गडकरी म्हणाले, डॉ. राजू देशमुख व डॉ. सुरेंद्र देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून गरीब लोकांची सेवा केली. अनेक लोकांचे जीव वाचविले. विदर्भातील मानसन्मान मिळवणाऱ्या पैकी राजू देशमुख आहेत. सुरेंद्र पाटील हे मेळघाटसारख्या आदिवासी भागात सेवा करीत आहेत. मधुभय्या जोशी यांचे नागपूरच्या नाट्यक्षेत्रात मोठे योगदान आहे. चांगले काम करणाऱ्यांना सन्मान मिळत नाही, वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही, ही समाज व सरकारची खंत असल्याचे त्यांनी सांगितले.
टेबलफू्रट म्हणून संत्रा स्वीकारला जावा, यासाठी इस्रायलच्या मदतीने मोर्शी भागात अशा स्वरुपाच्या संत्र्याची लागवड केली आहे. नागपुरात रामदेवबाबा यांच्या संत्रा प्रक्रिया केंद्रात ८०० टन संत्र्यांची गरज भासणार असल्याने लवकरच संत्र्याला चांगले दिवस येतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
नंदा जिचकार भाषणातून म्हणाल्या, वरुड परिसरातील मातीत वेगळाच गुण असून लोकांत गोडवा आहे. अनिल देशमुख म्हणाले, वरुड-मोर्शी यासह सहा तालुक्यातील लोकांच्या पुढाकाराने वरूड मित्र परिवाराची स्थापना झाली. या निमित्ताने गिरीश गांधी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार घडवून आणतात. हा स्तुत्य उपक्रम आहे.
आशिष देशमुख यांनी गिरीश गांधी यांना संत्रा उत्पादक सहा तालुक्याचा स्वतंत्र जिल्हा होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या माध्यातून ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्याची घोषणा दीपक खिरवडकर यांनी केली. यावेळी डॉ. राजू देशमुख व मधुभय्या जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकातून सत्कारमूर्तींच्या कार्याची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, शरद जिचकार, डॉ. अक्षयकुमार काळे, अनिल वऱ्हेकर, डॉ. वैशाली कुबडे, गोपाल वानखेडे, कमलेश राठी यांच्यासह वरुड-मोर्शी परिसरातील नागपूर येथील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश पाणूरकर यांनी तर आभार माधव देशपांडे यांनी मानले.
...पण देशमुख एकत्र राहू शकत नाही
माजी मंत्री अनिल देशमुख आपल्या भाषणात कार्यक्र मात देशमुखच अधिक असल्याचे म्हणाले, यावर नितीन गडकरी त्यांची फिरकी घेत म्हणाले, देशमुख अधिक असले तरी ते एकत्र राहू शकत नाही, याला उपस्थितांनीही हसून दाद दिली.

Web Title: Vidarbha's California will get great glory from water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.