विदर्भात संत्राबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:58 AM2018-02-12T00:58:06+5:302018-02-12T00:58:26+5:30

विदर्भातही गारपीट व अवकाळीने बळीराजाचे कंबरडे मोडले. संत्राबागा, खरिपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा यांचा शेतातच चिखल झाला.

 Vidarbha damage to oranges | विदर्भात संत्राबागांचे नुकसान

विदर्भात संत्राबागांचे नुकसान

Next

- अविनाश पगाडे /वीरेन्दकुमार जोगी/ज्ञानेश्वर मुंदे/ प्रशांत हेलोंडे/रवी जवळे/मनोज ताजने /इंद्रपाल कटकवार
 नागपूर : विदर्भातही गारपीट व अवकाळीने बळीराजाचे कंबरडे मोडले. संत्राबागा, खरिपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा यांचा शेतातच
चिखल झाला. अमरावतीत कांदा, गव्हाचे नुकसान अमरावती जिल्ह्यात पहाटे झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रब्बी पिकांना जबर फटका बसला. दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथे गंगाधर आत्माराम कोकाटे (७६) या शेतकºयाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे परिसरात भरारी पथकातील डॉक्टर अहीरकर व डॉ. शेख गारपिटीत जखमी झाले. ग्वरूड तालुक्यातील वाई येथे सात जनावरे वीज पडून दगावली, तर तुटलेल्या जिवंत तारांच्या स्पर्शाने एका बैलाचा मृत्यू झाला. गारपिटीने संत्रा पिकासह गहू, हरभरा, कांदा, तूर पिकांचे नुकसान झाले. केळीबागांनाही फटका बसला. अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी व वरूड येथील संत्राबागांचे नुकसान झाले. गव्हाला फटका बसला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. चांदूरबाजार तालुक्यात आमदार बच्चू कडू यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्यासह रविवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. आमदार अनिल बोंडे, रमेश बुंदिले यांनीही गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली.
यवतमाळमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या
यवतमाळला १० वाजेच्या सुमारास वादळासह पावसाला सुरुवात झाली. पुसद, महागाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव, घाटंजी, यवतमाळ तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. महागाव तालुक्यातील गुंज, बिजोरा, डोंगरगाव येथे जोरदार पाऊस झाला.
गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरला वादळी वाºयासह पाऊस
गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. वीज पडल्याने विनोद कुसन गावळकर (२८,रा. जेठभावडा) हा तरुण ठार झाला असून, जसवंता रूपलाला वाघाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघेही शेतात काम करीत होते. गडचिरोलीत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर विजेच्या तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. वर्धा जिल्ह्यात सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, आर्वी, आष्टी कारंजा तथा वर्धा तालुक्यातील पिकांना फटका बसला.
नागपूरला वीज कोसळून ४ जखमी-
नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून, मिरची, हरभरा, गहू आणि तुरीला जबर फटका बसला आहे. वीज पडून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली आश्रयाला बसलेले ३ मजूर व ट्रॅक्टरचालक चौघे जखमी झाले.

Web Title:  Vidarbha damage to oranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.