नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, धमकीचा इ-मेल जर्मनीहून!

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 30, 2024 11:50 PM2024-04-30T23:50:41+5:302024-04-30T23:51:32+5:30

या घटनेची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Threat to blow up Nagpur airport with a bomb, threatening e-mail from Germany | नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, धमकीचा इ-मेल जर्मनीहून!

नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, धमकीचा इ-मेल जर्मनीहून!

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा इ-मेल सोमवारी विमानतळ संचालकाला आला. हा इ-मेल जर्मनीहून आल्याची माहिती तपासणीदरम्यान पुढे आली आहे. या घटनेची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धमकीचा मेल सोमवारी सकाळी ९.४५ वाजता विमानतळ संचालकाला आल्यानंतर विमानतळ व्यवस्थापन चिंतेत आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम सुरू केली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाचा शोध मोहिमेत समावेश होता. तपासणीदरम्यान सुरक्षा यंत्रणांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. सोमवारी अशाच धमकीचे मेल नागपूरसह जयपूर, आगरतळा, श्रीनगर, चंदीगड आणि वाराणसी विमानतळ व्यवस्थापनालाही आले. या मेलमध्ये विमानतळांवर बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. 

सोमवारी विमानतळावर सोनेगाव पोलिसांची १५-१५ ची दोन पथके तैनात होती. मात्र मंगळवारी ५-५ चे पथक तैनात असून परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. संशयितांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा यंत्रणांचीही विमानतळावर नजर ठेवून आहेत.

Web Title: Threat to blow up Nagpur airport with a bomb, threatening e-mail from Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.