स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:44 PM2018-08-16T23:44:09+5:302018-08-16T23:45:05+5:30

नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असून नागरी सुविधाही स्मार्ट करण्यावर भर आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट होत आहे, मेट्रो येत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस, इलेक्ट्रिक टॅक्सी, ई-रिक्षा अशा अनेक पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि महापालिका अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Take advantage of smart urban amenities! | स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! 

स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! 

Next
ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार यांचे नागरिकांना आवाहन : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असून नागरी सुविधाही स्मार्ट करण्यावर भर आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट होत आहे, मेट्रो येत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस, इलेक्ट्रिक टॅक्सी, ई-रिक्षा अशा अनेक पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि महापालिका अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त सिव्हिल लाईन्स महापालिका मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड सिद्दिकी उपस्थित होते.
तत्पूर्वी महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अग्निशमन पथकाच्या पथसंचालनाचे महापौर, आयुक्त यांच्यासह मान्यवरांनी निरीक्षण केले. पथकाची मानवंदना स्वीकारली. संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रभाग १५ ला ५० लाखांचा पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डाची स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यात धरमपेठ झोनमधील प्रभाग क्र. १५ ला ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला. द्वितीय क्रमांक धंतोली झोनअंतर्गत येणाºया प्रभाग क्र. १७ ला जाहीर झाला असून तो ३५ लाख रुपयांचा आहे. १५ लाख रुपयांचा तृतीय क्रमांक धंतोली झोनमधीलच प्रभाग क्र. ३३ व प्रभाग क्र. ३५ ला विभागून जाहीर करण्यात आला.

फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत फिरत्या रुग्णवाहिकेचे महापौराच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

Web Title: Take advantage of smart urban amenities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.