नागपुरात डेंग्यूच्या सानिध्यात विद्यार्थी करताहेत अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:51 PM2018-11-10T12:51:43+5:302018-11-10T12:54:42+5:30

डेंग्यूचे सर्वाधिक शिकार विद्यार्थी ठरत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनासह शाळा व शिक्षण विभागाचे अधिकारी हात गुंडाळून बसले आहेत. गेल्या १५ दिवसात डेंग्यूमुळे तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Students are studying with danger of dengue in Nagpur | नागपुरात डेंग्यूच्या सानिध्यात विद्यार्थी करताहेत अभ्यास

नागपुरात डेंग्यूच्या सानिध्यात विद्यार्थी करताहेत अभ्यास

Next
ठळक मुद्देमनपा, शाळा व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा पालकांच्या तक्रारीकडेही लक्ष नाही

आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूचे सर्वाधिक शिकार विद्यार्थी ठरत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनासह शाळा व शिक्षण विभागाचे अधिकारी हात गुंडाळून बसले आहेत. गेल्या १५ दिवसात डेंग्यूमुळे तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक शाळकरी मुले शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात भरती आहेत.
यासंदर्भात प्र्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या विचारणा केली असता, ते म्हणाले की विद्यार्थ्यांना शाळेत नाही, तर घरीच डेंग्यू होत आहे. ते म्हणाले की, डेंग्यूचे डास हे साफ पाण्यात होतात आणि शाळेत साफ पाणी कुठे असते. ते असेही म्हणाले की, डेंग्यूचे डास हे दिवसा नाही तर रात्री चावतात.
अधिकाऱ्यांचे हे उत्तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखे आहे. कारण विद्यार्थी शाळेत सकाळपासून सायंकाळपर्यंत असतात.
सूत्रांच्या मते डेंग्यू आजाराने ग्रस्त असलेले सर्वाधिक विद्यार्थी हे सरकारी व अनुदानित शाळेचे आहेत. खासगी शाळेत डेंग्यूचे प्रकरण पुढे आले आहे.
शहरी भागात डेंग्यूचा प्रसार वेगाने वाढतो आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डेंग्यू होऊ शकतो, यासंदर्भात पालकांनी शिक्षण विभाग व मनपा प्रशासनाकडे तक्रारही केली होती. परंतु पालकांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही.

आकडे आहे, योजना नाही
सूत्रांच्या मते मनपा, शाळा प्रशासन व शिक्षण विभागातील अधिकाºयांना या प्रकरणी माहिती आहे. डेंग्यू किती विद्यार्थ्यांना झाला याची सुद्धा त्यांना माहिती आहे. असे असतानाही कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. प्रत्येकजण एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. शाळा व परिसरात डेंग्यू होण्यापासून कसे वाचविता येऊ शकते, यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात येत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत आहे.

अधिकारी म्हणाले होय झाला मृत्यू
प्राथमिक शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मान्य केले की, डेंग्यूमुळे काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. काही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना यासंदर्भात माहितीही मिळाली आहे. कारवाई संदर्भात विचारले असता, यासंदर्भात शाळांना तत्काळ उपाययोजना करण्याची सूचना देण्यात येईल.

Web Title: Students are studying with danger of dengue in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.