गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून : वितरणाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:34 PM2019-07-11T22:34:28+5:302019-07-11T22:35:30+5:30

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून गर्भनिरोधक साहित्य व औषधे उपलब्ध करून दिली जातात. परंतु लाभार्थ्यापर्यंत ते पोहचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भांडारात मागील काही दिवसांपासून गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून असल्याची माहिती सामोर आली आहे.

The stock of contraceptive medicines not used | गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून : वितरणाकडे दुर्लक्ष

गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून : वितरणाकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देकुटुंबनियोजन कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून गर्भनिरोधक साहित्य व औषधे उपलब्ध करून दिली जातात. परंतु लाभार्थ्यापर्यंत ते पोहचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भांडारात मागील काही दिवसांपासून गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून असल्याची माहिती सामोर आली आहे.
लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाळणा लांबविण्याच्या साधनांच्या वापरावर शासन भर देत आले आहे. यासाठी ‘कॉपर टी’, ‘निरोध’, ‘अंतरा’ नावाची लस, ‘छाया’ नावाच्या तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गोळ्यांचा पुरवठा शासनाकडून केला जातो. काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात ‘छाया’ व ‘अंतरा’ नावाची लस उपलब्ध करून देण्यात आली. उपसंचालक कार्यालयाने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहाही जिल्ह्यांना या गर्भनिरोधक औषधांचा पुरवठा केला. सूत्रानुसार, नागपूरसोडून इतर जिल्ह्यांमधील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (डीएचओ) लाभार्थींना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाटपही सुरू केले. मात्र, नागपूरस्तरावर याचे वाटपच झाले नाही. जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष व आरोग्य सभापतींचे कार्यालयही याबाबत अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे, या औषधीच्या वाटपासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे, उत्तर दिले जात आहे. परंतु प्रशिक्षणाला सुरुवात झाली का, किती जणांना प्रशिक्षण देण्यात येणार याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. परिणामी, शासनाच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Web Title: The stock of contraceptive medicines not used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.