शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुकाणू कमिटीचा ‘अन्नत्याग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:33 PM2018-03-19T21:33:07+5:302018-03-19T21:33:47+5:30

शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमिटीच्या वतीने सोमावरी जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

Steering Committee 'Sacrifice of Food' for farmers' demands | शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुकाणू कमिटीचा ‘अन्नत्याग’

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुकाणू कमिटीचा ‘अन्नत्याग’

Next
ठळक मुद्दे प्रतिकात्मक गळफास लावून शासनाच्या विरोधात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह १९ मार्च १९८६ रोजी सेवाग्राम येथे आत्महत्या केली. या घटनेला सोमवारी ३२ वर्षे पूर्ण झाली. दररम्यानच्या कालावधीत राज्यातील चार लाख शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या. आजही शेतकऱ्याच्या समस्या सुटलेल्या नाही. शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमिटीच्या वतीने सोमावरी जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रतिकात्मक गळफास लावून शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्यावा, शेतीमालाच्या हमी भावाकरिता मूल्य स्थिरीकरण कोषाची तरतूद करावी, दुधाला वाढीव भाव मिळावा, बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यावी. शेतकऱ्याना वीज बिल माफ करावे. आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. ज्या व्यवस्थेने शेतकऱ्याना आत्महत्या करण्याची वेळ आणली, त्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. आता सरकार जागे हाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याना आदरांजली वाहण्यात आली.
आंदोलनात शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी सुकाणू कमिटीचे विजयकु मार शिंदे, रविशंकर मांडवकर, मिलिंद महादेवकर, किशोर चोपडे, उत्तम सुळके, स्वप्निल साखरे, निलिकेश कोल्हे, अजय तागडे, रोशन काकडे, जय जवान जय किसान संघटनेचे अरुण लाटकर, किसान सभेचे संजय रणदिवे, जलीम शेख, वसंत मुंडले, ॠषी सहारे, नत्थू परतेती, गंगाराम खेडकर, किसान सभेचे ए.के.घोष, बंडू मेश्राम, विजय बाभुळकर, राजेंद्र गंगोत्री, जनसंपर्क मंचचे जेबुन्निसा शेख, विकास भिसीकर, बंडू वैद्य, बंडू शिंदे, विलास तुळशीकर, राजू वैद्य यांच्यासह शेतकऱ्याचा समावेश होता.

Web Title: Steering Committee 'Sacrifice of Food' for farmers' demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.