नागपूर मेट्रो रेल्वेला ३५० कोटी, तर मिहानला १०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:50 PM2018-03-09T23:50:56+5:302018-03-09T23:51:08+5:30

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मुंबईत विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता ३५० कोटी आणि मिहानसाठी १०० कोटींची तरतूद केली.

In State budget Nagpur Metro Rail Rs 350 crore and Mihan 100 crore | नागपूर मेट्रो रेल्वेला ३५० कोटी, तर मिहानला १०० कोटी

नागपूर मेट्रो रेल्वेला ३५० कोटी, तर मिहानला १०० कोटी

Next
ठळक मुद्दे राज्याचा अर्थसंकल्प : उद्योगांना वीजदरात सवलतगोरेवाडा प्राणिसंग्रहालयासाठी २० कोटी रामटेकच्या विकासासाठी २५ कोटीचक्रधर स्वामी नावाने रातुम नागपूर विद्यापीठात अध्यासनकोराडी युनिट-६ चे आधुनिकीकरणसौर ऊर्जेला प्रोत्साहनसमृद्धी महामार्गाचे बांधकाम एप्रिलपासून

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मुंबईत विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता ३५० कोटी आणि मिहानसाठी १०० कोटींची तरतूद केली.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे बांधकाम एप्रिल-२०१८ पासून सुरू करण्याची घोषणा करताना ३० महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा केला. अर्थसंकल्पात नागपूरसह राज्यातील जवळपास ११,७०० कि़मी. लांबीचे रस्ते बांधणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. एवढेच नव्हे तर विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील ‘डी आणि डी प्लस’ वर्गवारीतील उद्योगांना वीजदरात देण्यात येणाऱ्या सवलतीसाठी ९२६ कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तसेच संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात ‘सिट्रस इस्टेट’ संकल्पनेसाठी १५ कोटींची तरतूद केली आहे.
नागपूरसह १४५ मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टलवर (ई-नाम) आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. राज्यातील बसस्टॅण्ड आधुनिक करण्यासाठी ४० कोटींची तरतूद केली असून त्यामुळे नागपुरातील गणेशपेठ येथील बसस्टॅण्ड अद्ययावत होईल. चक्रधर स्वामींच्या नावाने रातुम नागपूर विद्यापीठात अध्यासन स्थापन होणार आहे. अर्थसंकल्पात रामटेकच्या एकूण १५० कोटींच्या विकास आराखड्यात २५ कोटींची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. महाऊर्जेला अर्थसाहाय्य म्हणून १०६ कोटी, ग्रीन सेस फंडासाठी ५०४ कोटी, अटल सौर कृषिपंपासाठी ३१ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे नागपुरात सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना मिळेल. विदर्भ मराठवाडा कृषिपंपाच्या विद्युतीकरणासाठी ७०० कोटी आणि कोराडी युनिट-६ चे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: In State budget Nagpur Metro Rail Rs 350 crore and Mihan 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.