स्मार्ट सिटीसाठी हवे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट : गौरव चौकसे यांनी दिला फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 09:17 PM2019-02-19T21:17:12+5:302019-02-19T21:19:02+5:30

शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.

Smart traffic management for Smart City: Gaurav Chaukase gave the formula | स्मार्ट सिटीसाठी हवे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट : गौरव चौकसे यांनी दिला फॉर्म्युला

स्मार्ट सिटीसाठी हवे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट : गौरव चौकसे यांनी दिला फॉर्म्युला

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटी आयडिया चॅलेंजमध्ये ठरला अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.
महापालिकेने २०१५ मध्ये स्मार्ट सिटीसाठी काही आयडिया मागितल्या होत्या. यातील पहिल्या तीन आयडिया देणाऱ्यांना मनपा शहराचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. त्यांना पुरस्कृतही करणार होती. मनपाने त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केले होते. नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्याला प्रतिसाद देत १४०० आयडिया मनपाला पाठविला. यातून गौरवने दिलेली आयडिया प्रथम ठरली होती. गौरवने हा प्रोजेक्ट तयार करताना, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यातून काही त्रुटी काढल्या. पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था लक्षात घेतली. त्यावर अभ्यास करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली. त्याने नागपूर झूम अ‍ॅप तयार केले. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीवर फोकस केले.
जीपीएसने केली सार्वजनिक वाहतूक ट्रॅक
गौरवने तयार केलेल्या प्रोजेक्टमध्ये सर्वात प्रथम त्याने सिटी बसवर फोकस केले. कारण आजही नागपूरकरांमध्ये शहर बससंदर्भात संभ्रम आहे. बसची निश्चित वेळ, थांबे याबाबत माहिती नाही. गौरव जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसला लावून अ‍ॅपच्या माध्यमातून बसची इत्थंभूत माहिती मोबाईलद्वारे नागरिकांना मिळणार होती. ओला, उबेर या खासगी प्रवासी वाहनांप्रमाणे ही यंत्रणा संचालित होणार होती. त्याचा डेमोसुद्धा गौरवने दिला होता.
स्मार्ट सिग्नल
शहरातील वाहतुकीच्या समस्येचे मूळ म्हणजे सिग्नलचे मॅनेजमेंट नाही. शहर स्मार्ट होताना वाहतुकीची व्यवस्था स्मार्ट झाली नाही. रस्त्यावर वाहतूक कितीही असली तरी, आपल्या सिग्नलमध्ये ३० सेकंदचा टाईम सेट आहे. गौरवने शहरातील सिग्नलला सेंसरच्या माध्यमातून ऑपरेट करण्याची आयडिया दिली होती. यातून सिग्नल वाहतुकीची स्थिती लक्षात घेता ऑटोमॅटिक ऑपरेट होणार होते. त्यामुळे आज जसा आपत्कालीन वाहतूक व्यवस्थेला फटका बसतो तो या यंत्रणेमुळे बसणार नव्हता.
पार्किंगच्या समस्येवरही दिला पर्याय
शहरातील विशेषकरून बाजारपेठ परिसरात पार्किंगची बिकट समस्या निर्माण झाली होती. कारण चारचाकी वाहने झपाट्याने वाढली आहेत. लोकांना अजूनही पार्किंगच्या जागा माहिती नाही. गौरवने तयार केलेला नागपूर झुम अ‍ॅप पार्किंगची समस्या सोडविण्यास महत्त्वाचा ठरणार होता.
पण आयडिया आता धूळखात आहे
२०१५ मध्ये या आयडिया मनपाला दिल्या होत्या. मनपा त्याची अंमलबजावणी करणार होती. चांगल्या आयडियांना पुरस्कृत करून, पहिल्या तीन आयडियांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. पण आज या आयडिया धूळखात पडल्या आहेत. २०१५ च्या आयडिया २०१९ मध्ये पुरस्कृत करण्यात आल्या आहे. अजूनही कुणाला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले नाही, याची खंतही गौरवने व्यक्त केली.

Web Title: Smart traffic management for Smart City: Gaurav Chaukase gave the formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.