घरातूनच वेगळा करा ओला आणि सुका कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 08:27 PM2019-11-16T20:27:09+5:302019-11-16T20:32:52+5:30

२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

Separate your home from wet and dry waste | घरातूनच वेगळा करा ओला आणि सुका कचरा

घरातूनच वेगळा करा ओला आणि सुका कचरा

Next
ठळक मुद्देनागपूर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांचे आवाहन : दररोज आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनीचे कंत्राट संपुष्टात आले आहे.महापालिकेने नवीन दोन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांनी शनिवारपासून कचरा संकलनाच्या कामाला सुरूवात केली आहे. नागरिकांच्या घरातील कचरा वर्गीकृत करूनच घेणार आहे. सुरुवातीला याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्तअभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
महापालिका मुख्यालयातील सभागृहात शनिवारी नवीन कंपन्यांच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत आयुक्त बोलत होते. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले, यंत्रणा ही नवीन असल्याने सुरुवातीला काम करायला थोडा त्रास जाईल. काही सजग नागरिक कचरा विलग करून देतील. परंतु सर्वच नागरिक कचरा विलग करून देणार नाहीत. याबाबत यंत्रणेमार्फत नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. २० तारखेपर्यंत नागरिकांना याबाबत अवगत करावे. २० तारखेनंतर कुठल्याही घरातून कचरा एकत्रित घेऊ नका, असे निर्देश आयुक्तांनी कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला दिले आहेत. जोपर्यंत यंत्रणा सुरळीत कार्य करीत नाही, तोपर्यंत दररोज आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये त्यांना काही त्रुटी आढळून आल्याचे दिसून आले. त्या तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी यंत्रणेला दिले.
वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी नवीन यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती सांगितली. आतापर्यंत शहरात १७० कचरा संकलन केंद्र होते. आता नवीन यंत्रणेच्या कार्यपद्धतीनुसार फक्त २५ ट्रांन्सफर युनिट असणार आहेत. यामध्ये गाडीतून कचरा मोठ्या गाडीत टाकल्या जाणार आहे. तेथूनच तो कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविला जाणार आहे. कचऱ्याचा पुरेपूर उपयोग करून त्यावर प्रक्रिया करणार असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.

जुन्या कर्मचाऱ्यांना समावून घेणार
यावेळी जुन्या कचरा संकलन यंत्रणा कनक रिसोर्सेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडला. यावर बोलताना आयुक्त यांनी कनकच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन यंत्रणेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी अट निविदेमध्ये समाविष्ट केली असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

कचरा वर्गीकृत करूनच द्या
आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी महानगरपालिका प्रयत्नरत आहे. नागरिकांनी मनपाच्या प्रयत्नांना सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा ओला सुका वर्गीकृत करून द्यावा, असे आवाहन अभिजित बांगर यांनी केले.

Web Title: Separate your home from wet and dry waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.