खळबळ : नागपुरात बडतर्फ कनिष्ठ लिपिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 08:09 PM2019-02-05T20:09:26+5:302019-02-05T22:32:20+5:30

सेवेतून बडतर्फ केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्याने सरपंच भवनात आत्महत्येचा प्रयत्न केला. अभय ठाकरे (४२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सरपंच भवनातील पतसंस्थेच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Sensation: An attempt for suicide of dismissed junior clerk in Nagpur | खळबळ : नागपुरात बडतर्फ कनिष्ठ लिपिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळ : नागपुरात बडतर्फ कनिष्ठ लिपिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सरपंच भवनातील घटना :प्रकृती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेवेतून बडतर्फ केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्याने सरपंच भवनात आत्महत्येचा प्रयत्न केला. अभय ठाकरे (४२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सरपंच भवनातील पतसंस्थेच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
अभय ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी प्रशासकीय पतसंस्थेत कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था आहे. काही काळापूर्वी या पतसंस्थेचे १५ सदस्यीय संचालक मंडळ होते. काही वादांमुळे या पतसंस्थेच्या आठ संचालक सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता सात सदस्य संचालकांमार्फत ही पतसंस्था चालविली जात आहे. या पतसंस्थेत चार कर्मचारी असून अभय ठाकरे हे त्यातील एक आहेत. कायमतत्त्वावर हे कर्मचारी काम करीत असतात. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते काही दिवस सुट्यांवर होते, असे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार ठाकरे यांच्या सुट्यांचे प्रमाण वाढत असल्याने संचालक मंडळाने त्यांची सेवा बरखास्त केली होती. यामुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. ते रोज कार्यालयात येत असत अशी माहिती प्राप्त झाली आहे. अखेर मंगळवारी त्यांनी कार्यालयाच्या परिसरातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर परिसरातील एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.

 

Web Title: Sensation: An attempt for suicide of dismissed junior clerk in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.