मॉलमध्ये सुरक्षेचागोलमाल

By admin | Published: May 24, 2015 02:53 AM2015-05-24T02:53:39+5:302015-05-24T02:53:39+5:30

मानवाची जीवनशैली बदलत चालली आहे. मॉल व मल्टीप्लेक्स या जीवनशैलीचे महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत.

Safety guides in malls | मॉलमध्ये सुरक्षेचागोलमाल

मॉलमध्ये सुरक्षेचागोलमाल

Next

नागपूर : मानवाची जीवनशैली बदलत चालली आहे. मॉल व मल्टीप्लेक्स या जीवनशैलीचे महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षात मॉल व मल्टीप्लेक्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. या ठिकाणी कुटुंबासह निवांत क्षण व जीवनवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु शहरातील या मॉल व मल्टीप्लेक्स इमारतींमध्ये सुरक्षेकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे येथे येणाऱ्या नागरिकांचा जीव संकटात सापडला आहे.
काही दिवसांपूर्वी कोलकाता आणि मुंबई येथील इमारतींना लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील या भव्य इमारतींमध्ये नागरिकांचा जीव किती सुरक्षित आहे, आग किंवा एखादी आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक सुरक्षितपणे कसे बाहेर पडू शकतील यासंबंधात लोकमतने शनिवारी एका तज्ज्ञ अधिकाऱ्यासोबत नागपुरातील मॉल व मल्टीप्लेक्सची पाहणी केली. तेव्हा जवळपास सर्वच इमारतींमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले. नगरविकास विभाग आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी केवळ सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजनांची खानापूर्ती केल्याचे आढळून आले. त्यामुळेच गेल्या महिन्यात अग्निशमन विभागाने अशा इमारतींना नोटीससुद्धा बजावली होती. यासंबंधीचा संपूर्ण आढावाच लोकमतने घेतला आहे.

Web Title: Safety guides in malls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.