रस्तोगी प्रधान आयुक्त, संजय कुमार कस्टम आयुक्त; केंद्रीय सीजीएसटी नागपूर विभागाला अधिकारी मिळाले

By मोरेश्वर मानापुरे | Published: September 30, 2023 07:45 PM2023-09-30T19:45:09+5:302023-09-30T19:45:29+5:30

दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदभार स्विकारला आहे. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रलंबित कामांचा निपटारा तातडीने होईल, असा विश्वास कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आहे.

Rastogi chief Commissioner, Sanjay Kumar Customs Commissioner; Central CGST Nagpur Division got officers | रस्तोगी प्रधान आयुक्त, संजय कुमार कस्टम आयुक्त; केंद्रीय सीजीएसटी नागपूर विभागाला अधिकारी मिळाले

रस्तोगी प्रधान आयुक्त, संजय कुमार कस्टम आयुक्त; केंद्रीय सीजीएसटी नागपूर विभागाला अधिकारी मिळाले

googlenewsNext

नागपूर : केंद्रीय जीएसटी विभागात अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांवर दाेन अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर-१ चे प्रधान आयुक्तपदी अतुल कुमार रस्तोगी तर कस्टम आयुक्त म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश २७ सप्टेंबरला निघाले आहेत.

अतुल कुमार रस्तोगी हे १९९२ च्या बॅचचे अधिकारी असून नागपूर विभागात नियुक्तीआधी हावरा येथे जीएसटी व सीएक्स विभागात प्रधान आयुक्त पदावर कार्यरत होते. तर संजय कुमार हे २००५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते पदोन्नतीवर नागपुरात आले आहेत. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदभार स्विकारला आहे. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रलंबित कामांचा निपटारा तातडीने होईल, असा विश्वास कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Rastogi chief Commissioner, Sanjay Kumar Customs Commissioner; Central CGST Nagpur Division got officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.