रजनी लांजेवारला सात वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:56 AM2017-09-08T01:56:12+5:302017-09-08T01:56:33+5:30

बहुचर्चित पीयूष अशोक गाडेकर आत्महत्याप्रकरणी तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांच्या न्यायालयाने आरोपी महिला रजनी प्रवीण लांजेवार हिला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Rajni Langevar has been imprisoned for seven years | रजनी लांजेवारला सात वर्षे कारावास

रजनी लांजेवारला सात वर्षे कारावास

Next
ठळक मुद्देन्यायालयाने आरोपी महिला रजनी प्रवीण लांजेवार हिला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित पीयूष अशोक गाडेकर आत्महत्याप्रकरणी तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांच्या न्यायालयाने आरोपी महिला रजनी प्रवीण लांजेवार हिला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रजनी लांजेवार (३३) ही अंबाझरी भागातील वर्मा ले-आऊट येथील रहिवासी आहे. मृत पीयूष गाडेकर हा २२ वर्षांचा तरुण प्रतापनगर भागातील अनसूयानगर भामटी रिंगरोड येथील रहिवासी होता. तो रविनगर येथील प्रगती महाविद्यालयाचा बीसीए द्वितीय वर्षांचा विद्यार्थी होता. त्याने २४ जानेवारी २०१२ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रजनी लांजेवार हिच्या बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. पीयूषचे वडील अशोक रतिराम गाडेकर यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी ६ एप्रिल २०१२ रोजी रजनीविरुद्ध भादंविच्या ३०६ कलमान्वये (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल केला होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीयूष याचे वडील अशोक गाडेकर यांचा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय असल्याने त्यांची रजनीचे पती अ‍ॅड. प्रवीण लांजेवार यांच्याशी घटनेच्या दोन वर्षांपूर्वीपासून ओळख होती. लांजेवार हे नोटरीचेही काम करायचे. गाडेकर हे नेहमी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे पत्र अ‍ॅड. लांजेवार यांच्याकडूनच करायचे. हळूहळू गाडेकर आणि लांजेवार यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. पीयूष हा आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात मदत करीत होता. भूखंडाची खरेदी-विक्री, विक्रीपत्र तयार करणे, बँकेत पैसे जमा करणे आदी काम तो करायचा. त्यामुळे त्याचेही अ‍ॅड. लांजेवार यांच्या घरी येणे-जाणे होते. पीयूष आणि रजनीमध्ये परस्पर संबंध निर्माण झाले होते. हे दोघे इतरत्र फिरताना पीयूषच्या मित्रांना दिसायचे. त्याचे मित्र याबाबत पीयूषच्या वडिलांना सांगायचे. पीयूष पैशाची उधळपट्टी करीत असल्याचे वडिलांना समजले होते. पीयूषने वडिलांच्या आड त्यांच्या व्यवसायातील दीड-दोन लाख रुपये रजनीला उधार दिले होते. त्याने आपले पैसे परत मागितले असता, तिने पैसे देण्यास नकार दिला होता. उलट ती वाईट परिणामाची भीती दाखवून पीयूषला वारंवार पैसे मागू लागली होती. रजनीमुळे त्रस्त होऊन पीयूषने तिच्याच बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. आर. धांडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपी रजनीला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे, फिर्यादी अशोक गाडेकर यांच्यावतीने अ‍ॅड. नबाब खान, अ‍ॅड. नीता गौतम आणि आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी काम पाहिले. पीयूषला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात रजनीला अटक झाली नव्हती.
सतत ती अटक टाळत होती. सत्र न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने रजनी लांजेवार हिला अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिला अटकपूर्व जामीन मिळाला होता. सतत अटक टाळणाºया रजनीला गुरुवारी न्यायालयाने शिक्षा सुनावताच ती ढसाढसा रडली. अखेर तिला कारागृहात जावेच लागले.

Web Title: Rajni Langevar has been imprisoned for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.