पांढराबोडी तलावाचे सौंदर्यीकरण त्वरीत करा

By admin | Published: August 22, 2014 01:34 AM2014-08-22T01:34:05+5:302014-08-22T01:34:05+5:30

पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य

Quickly beautify the waterproof pond | पांढराबोडी तलावाचे सौंदर्यीकरण त्वरीत करा

पांढराबोडी तलावाचे सौंदर्यीकरण त्वरीत करा

Next

परिणय फुके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : शासनाकडून ४२५ कोटीचा निधी मंजूर
नागपूर : पांढराबोडी तलाव कधीकाळी शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक होता. कालांतराने या तलावाचे अस्तित्व संपत गेले. सध्या हा तलाव अतिशय दुर्लक्षित अशा स्थितीत आहे. तलावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तलावाला नवसंजीवनी मिळावी, सौंदर्यीकरण व्हावे, अशी मागणी येथील नागरिकांनी नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्याकडे केली होती. यासंदर्भात परिणय फुके यांनी महाराष्ट्र शासन व मनपाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ४२५ कोटींचा निधी मंजूर झाला. असे असतानाही सौंदर्यीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण ताबडतोब करावे, असे निर्देश फुके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
अनेक वर्षापासुन पांढराबोडी तलावाचा प्रश्न प्रलंबित होता़ तलावासाठी या परिसरातील नागरिकांना कोर्टाची पायरीसुध्दा चढावी लागली होती़ नगरसेवक परिणय फुके यांनी याकरिता महाराष्ट्र शासन आणि मनपाकडे सतत पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच शासनाने ४२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़ या तलावाच्या विकासामुळे परिसरातील शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे़
सौंदर्यीकरणामुळे परिसराला चौपाटीचे स्वरूप येणार आहे़ तसेच तलावालाही जुने वैभव प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा हा परिसर निसर्गरम्य होईल, अशी माहिती नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांनी दिली़ त्यांनी परिसरातील नागरिकांसह तलावाची पाहणी केली. यावेळी प्रसिध्द अ‍ॅड. आनंद परचुरे, रवि वाघमारे, राधेश्याम समरीत, दत्तात्रय गार्वे, दशरथ घोडमारे, विजय देशपांडे, गणेश जैस्वाल, महेश बारंगे, विजय चिकने, सुनील खंडारे, सुरेश कोहळे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Quickly beautify the waterproof pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.