नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यातील पीएसआयची गुंडागर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:30 PM2018-09-22T23:30:01+5:302018-09-22T23:30:41+5:30

पोलीस स्टेशनसमोर वाहन पार्क करण्यावरून इमामवाड्यातील पीएसआयने विदेशी पाहुण्यांसोबत असभ्य वर्तन करीत गुंडागर्दी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

PSI felony in Imamwada police station in Nagpur | नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यातील पीएसआयची गुंडागर्दी

नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यातील पीएसआयची गुंडागर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देपार्किंगवरून शिवीगाळ : विदेशी पाहुण्यांशी असभ्य वर्तन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस स्टेशनसमोर वाहन पार्क करण्यावरून इमामवाड्यातील पीएसआयने विदेशी पाहुण्यांसोबत असभ्य वर्तन करीत गुंडागर्दी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नवनाथ पाटवदकर असे या पीएसआयचे नाव आहे. रविवारी नागपुरात आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या
कार्यक्रमासाठी थायलंड, बांगलादेश व म्यानमार येथील प्रतिनिधी सहभागी होण्यासाठी आले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था इमामवाडा पोलीस स्टेशनसमोरील हॉटेल तयबा येथे करण्यात आली आहे. रविवारी सामाजिक कार्यकर्ते आणि या परिषदेचे आयोजक असलेले नितीन गजभिये हे या विदेशी पाहुण्यांना घेऊन कारने हॉटेलात आले. घाटरोडवर सध्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. हॉटेलसमोरच रस्त्याचे काम सुरू असल्याने गाडी ठेवायला जागा नाही. हॉटेलमध्ये येणारे लोकही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच म्हणजे पोलीस स्टेशनसमोरच वाहन पार्क करतात. गजभिये यांनीही तिथेच कार पार्क करण्याचा प्रयत्न केला. यावरून पीएसआय पाटवदकर यांचा पारा चढला. त्यांनी शिवीगाळ करीत गाडी हटविण्यास सांगितले. त्यावेळी कारमध्ये थायलंड येथील बौद्ध भंतेही बसले होते. गजभिये आणि त्यांच्या एक महिला साथीदार यांनी पीएसआयला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पुन्हा उद्धट उत्तर देत गजभिये आणि महिलेला ताब्यात घेत त्यांच्या जवळचे मोबाईल जप्त केले. नितीन गजभिये यांनी घडलेला हा प्रकर नंतर पत्रपरिषदेत विशद केला. पीएसआयने त्यांना बेल्टने मारहाणसुद्धा केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांची ही गुंडागर्दी असून याविरुद्ध आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिपाइंचे प्रकाश कुंभे यांनीसुद्धा या घटनेचा निषेध करीत पीएसआयला निलंबित करण्याची मागणी केली. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी गजभिये यांनीच पोलिसांशी वाद घातल्याचे सांगितले.

 

Web Title: PSI felony in Imamwada police station in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.