उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 08:30 PM2018-01-15T20:30:19+5:302018-01-15T20:34:32+5:30

उद्योजकांचे प्रश्न व निगडित समस्या सोडविण्यास राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) बुटीबोरी येथील आधुनिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

Priority to solve the problems of entrepreneurs: Devendra Fadnavis | उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देबीएमए सभागृहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योजकांचे प्रश्न व निगडित समस्या सोडविण्यास राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) बुटीबोरी येथील आधुनिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर होते. ग्रामपंचायत कराचे योग्य निर्धारण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी १८ फेब्रुवारी २०१८ ला मुंबईत होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक स्तराच्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि विदर्भातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोग आपल्या उद्योग वाढीसाठी करावा, असे आवाहन केले.
फडणवीस म्हणाले, रेडी रेकनरचे वाढीव दर हा राज्यस्तरीय विषय असून त्याचे लवकरच निर्धारण करण्यात येईल. मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अतिरिक्त २२० केव्हीएचे सबस्टेशन लगेच उभारण्यात येईल. मेट्रो रेल्वे बुटीबोरीपर्यंत नेण्यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, सचिव चंद्रशेखर शेगांवकर, सीआयआयचे विदर्भ प्रांत अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारख, एमआयडीसीचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी, महाव्यवस्थापक गजेंद्र भारती, प्रादेशिक अधिकारी जे.बी. संगीतराव, मुख्य अभियंता एस.आर. वाघ, कार्यकारी अभियंता मोडावे, एस.एस. आकुलवार, महावितरणचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ, कार्यकारी अभियंता डी.यू. घाटोळ उपस्थित होते.
कार्यक्रमात असोसिएशनचे मानद सचिव जीवन धीमे, उपाध्यक्ष पुनित महाजन व मनीष सिंघवी, कोषाध्यक्ष प्रशांत मेश्राम, माजी अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, हेमंत अंबासेलकर, के.एन. सिथा यांच्यासह पदाधिकारी राकेश सुराणा, रवी अग्रवाल, जयसिंग चव्हाण, प्रदीप राऊत, संजय नागुलवार, संजय भालेराव, अल्केश सराफ, सी.पी. सरकार, सीए मिलिंद कानडे आणि कॅल्डरीज, इंडोरामा, रिलायन्स पॉवर, सिएट टायर्स, एसएमएस इनोकेअर, इनोव्हेटिव्ह टेक्सटाईल या कंपन्यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते. संचालन सीए मिलिंद कानडे यांनी केले.

Web Title: Priority to solve the problems of entrepreneurs: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.