लोकसभा-विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 09:23 PM2018-05-11T21:23:58+5:302018-05-11T21:36:26+5:30

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील सर्व लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधून पक्षसंघटनेचा आढावा घेतला.

Prepare to contest Lok Sabha and Assembly elections | लोकसभा-विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी करा

लोकसभा-विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी करा

googlenewsNext
ठळक मुद्देउद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद : विदर्भात संघटनात्मक बांधणीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील सर्व लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधून पक्षसंघटनेचा आढावा घेतला. जवळपास साडेतीन वर्षांनंतर विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला हे विशेष.http://cms.lokmat.com/topics/ contest Lok Sabha and Assembly elections on self
उद्धव ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते थेट रविभवनला रवाना झाले व सकाळी ११ वाजेपासून बैठकांच्या सत्राला प्रारंभ झाला. दिवसभरात त्यांनी नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, अमरावती, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर, अकोला व बुलडाणा या लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक लोकसभेतील संघटनेचा विस्तार, संघटनेतील त्रुटी, पक्षाच्या जमेच्या बाजू, जनतेच्या शिवसेनेकडून असलेल्या अपेक्षा इत्यादी बाबी जाणून घेतल्या. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पुढील निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय झाला असल्याने प्रत्येकाने आतापासूनच कामाला लागले पाहिजे. त्यासाठी पक्षाला मजबुती देण्यासाठी प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा.अरविंद सावंत, खा.आनंद अडसूळ, खा.भावना गवळी, खा.कृपाल तुमाने, खा.प्रताप जाधव, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा संघटक, जिल्हा परिषद अध्यक्ष हे पदाधिकारी उपस्थित होते.
नागपुरात आणखी एक जिल्हाप्रमुख हवा
नागपुरातील कार्याचा भविष्यातील विस्तार लक्षात घेता आणखी एक जिल्हाप्रमुख हवा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी बैठकीदरम्यान केली. मनपा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर सतीश हरडे यांच्या जागी माजी खासदार प्रकाश जाधव यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र पक्षसंघटना बळकटीसाठी आणखी एक जिल्हाप्रमुख हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
काही कार्यकर्त्यांची नाराजी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला आपल्याला निमंत्रित केले नाही, म्हणून काही कार्यकर्ते नाराज झाले होते. रविभवन परिसरात विदर्भातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र बैठकीला निवडक पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. यावरुन काही कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने धक्का
अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय हे धडाडीचे व कर्तबगार पोलीस अधिकारी होते. त्यांची प्रकृती ठीक नव्हती व त्यांची झुंज सुरू होती. परंतु त्यांनी उचललेले पाऊल धक्कादायक आहे. असे व्हायला नको होते. या घटनेमुळे धक्काच बसला आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Web Title: Prepare to contest Lok Sabha and Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.