निवडणुकीच्या रंगात रंगू लागलेत राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:27 AM2018-07-03T01:27:19+5:302018-07-03T01:29:50+5:30

Political parties in color are contesting elections | निवडणुकीच्या रंगात रंगू लागलेत राजकीय पक्ष

निवडणुकीच्या रंगात रंगू लागलेत राजकीय पक्ष

Next
ठळक मुद्देमिशन २०१९ : सर्व पक्षांनी सुरू केली तयारी


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी शहरात मात्र निवडणुकीचा रंग दिसूू लागला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात मॅसेजेस सुरू झाले आहेत. शहरात प्रमुख राजकीय पक्षही आपली शक्ती दाखवायला लागले आहेत. आपापल्या क्षमतेनुसार ते नागरिकांशी संपर्क वाढवण्याच्या कामाला लागले आहेत.

भाजपा सक्रिय : नागरिकांशी संपर्क साधताहेत कार्यकर्ते
मागच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादित करणारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) २०१९ च्या निवडणुकीसाठी सर्वात अगोदर सक्रिय झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रूपात लोकसभेचा उमेदवारही जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पक्ष आतापासूनच एकजुटीने मैदानात उतरला आहे. ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत पक्षाचे नेते व पदाधिकारी लोकांच्या घरोघरी जाऊन गेल्या चार वर्षातील सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांना देत आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी समरसता अभियानही सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रकारे महापुरुषांच्या प्रतिमा परिसर स्वच्छ करण्याची मोेहीम सुरू करून पक्षाने थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचप्रकारे ज्येष्ठ नागरिकांमध्येसुद्धा पोहोचण्याच्या दृष्टीने संमेलने आयोजित केली जात आहेत.

काँग्रेस लागली संघटनेला मजबूत करण्याचा कामाला

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाकडून पराभव स्वीकारल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा आपल्या संघटनेला मजबूत करण्याच्या कामाला लागली आहे. शहरातील १९५२ निवडणूक बूथवर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर ११ सदस्यांची एक कमिटी तयार करण्यात येणार आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले की, जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. यावेळी पक्षाचा उमेदवार नव्हे तर संघटना निवडणूक लढणार आहे. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी असेल. दुसरीकडे युवक
काँग्रेसमध्येही संघटनात्मक निवडणुकीसाठी नवीन सदस्य बनविले जात आहेत.

शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत
मागच्या निवडणुकांमध्ये भाजपला सहकार्य करणारी शिवसेना यंदा वेगळ्याच मूडमध्ये आहे. पक्षप्रमुख उद्धव ठकरे यांनी नागपुरात येऊन शिवसैनिकांना स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनीसुद्धा शिवसेना ही स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याची बाब स्वीकार केली आहे. सध्या पक्षाने उमेदवारांच्या नावावर विचार सुरू केलेला नाही. परंतु दमदार उमेदवार मैदानात उतरविले जातील हे निश्चित, असे त्यांचे म्हणणे आहे.

बसपाही शोधत आहे संधी
मागच्या निवडणुकीत शहरात चांगले प्रदर्शन करणाऱ्या बहुजन समाज पार्टीने येणाºया निवडणुकीतही संधी शोधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी व खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्याचा दौरा करून बसपा कर्यकर्त्यांचे मत विचारात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आघाडी झाली तर बसपा आपले मत सहयोगी पक्षाच्या उमेदवाराला ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करेल. पक्षाचे अनेक नेते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेससोबत आघाडी करणार राकाँपा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपासोबत लढण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याचे मन बनविले आहे. पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांचे म्हणणे आहे की, भाजपला हरविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. दुसरीकडे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितले की, आज शहर कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष संघटनेला मजबुती देण्यावर चर्चा झाली. प्रत्येक बुथवर १० कार्यकर्ते तयार करण्यात येतील. त्याचप्रकारे पार्टीतील युवा व महिला शाखेलाही प्रत्येक बुथवर १० कार्यकर्त्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

Web Title: Political parties in color are contesting elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.