ठळक मुद्देप्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या मारेकºयांच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या मारेकºयांच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.
प्राचार्यांच्या पत्नी अनिता मोरेश्वर वानखेडे (४६), मुलगी सायली पवन यादव (२६) दोन्ही रा. एचआयजी म्हाडा कॉलनी नरेंद्रनगर, शुभम ऊर्फ बंटी चिंधूजी मोहुर्ले (२२) , शशीकांत ऊर्फ सोनू चंद्रकांत चौधरी (१९) , अंकित रामलाल काटेवार (१९) तिन्ही रा. नीलडोह आणि सागरसिंग ऊर्फ पाजी बाला कपूरसिंग बावरी (२०) रा. हिंगणा सूरजनगर, अशी आरोपींची नावे आहेत.
३ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास नीरी प्रवेशद्वारासमोर धारदार शस्त्र आणि तलवारीने वार करून चंद्रपूरच्या खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य वानखेडे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. आरोपींपैकी सायली हिचे आरोपी शुभम मोहुर्ले याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. तसेच अनिताचेही अन्य दुसºयाशी विवाहबाह्य संबंध होते. दोघींनी आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी गुन्हेगारी कट रचून भाडोत्री गुंडांना पाच लाखांची सुपारी देऊ करून प्राचार्य वानखेडे यांना भयावहरीत्या कायमचे संपविले. प्रत्यक्ष मारेकºयांमध्ये एकूण चार आरोपी असून अंकुश किशोर बडगे हा फरार आहे. सहा आरोपींना ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपताच त्यांना गुरुवारी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. आर. पाटील यांनी न्यायालयात हजर करून त्यांचा १३ नोव्हेंबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. उदय डबले आणि अ‍ॅड. परीक्षित मोहिते यांनी बाजू मांडली.