ग्राम पंचायत हद्दीतही मद्य विक्रीला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:40 PM2019-01-02T22:40:24+5:302019-01-02T22:42:36+5:30

आता ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गही ओले होणार आहेत. दोनपैकी एक निकष पूर्ण होत असल्यास ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर मद्य विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी रोजी हा निर्णय जारी करण्यात आला.

Permission for sale of liquor in the Gram Panchayat limits | ग्राम पंचायत हद्दीतही मद्य विक्रीला परवानगी

ग्राम पंचायत हद्दीतही मद्य विक्रीला परवानगी

Next
ठळक मुद्देराज्य सरकारचा निर्णय : राज्य व राष्ट्रीय महामार्ग होणार ओले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गही ओले होणार आहेत. दोनपैकी एक निकष पूर्ण होत असल्यास ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर मद्य विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी रोजी हा निर्णय जारी करण्यात आला.
२०११ च्या जनगणणेनुसार किमान ३००० लोकसंख्या असलेल्या किंवा महानगरपालिका हद्दीपासून ३ किलोमीटर आणि नगरपरिषदा/नगर पंचायती हद्दीपासून १ किलोमीटर परिसरामधील ग्राम पंचायतींना हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयातून दारुबंदीचे जिल्हे वगळण्यात आले आहेत. १५ डिसेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘तामिळनाडू सरकार वि.के. बालू व इतर’ प्रकरणामध्ये महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायती हद्दीतील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्रीच्या लायसन्सचे १ एप्रिल २०१७ पासून नूतनीकरण करण्यास मनाई केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशानुसार आवश्यक निकषांची पूर्तता करणाऱ्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यात आले. दरम्यान, निकषांची पूर्तता न करणाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यात २ मे २०१८ रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरकारने याचिकाकर्त्या लायसन्सधारकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यानंतर हा निर्णय जारी केला.

Web Title: Permission for sale of liquor in the Gram Panchayat limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.