दारू गुत्त्याविरोधात आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:28 AM2017-10-03T00:28:50+5:302017-10-03T00:29:19+5:30

सिरसपेठ, इमामवाडा परिसरात चालविल्या जाणाºया दारूच्या अवैध गुत्त्यांमुळे परिसरातील नागरिक विशेषत: महिला-मुलींना प्रचंड त्रास वाढला आहे.

Outrage against alcoholism | दारू गुत्त्याविरोधात आक्रोश

दारू गुत्त्याविरोधात आक्रोश

Next
ठळक मुद्देइमामवाड्यात तणाव : पोलीस ठाण्याला घेराव, पाठबळ पोलिसांचेच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिरसपेठ, इमामवाडा परिसरात चालविल्या जाणाºया दारूच्या अवैध गुत्त्यांमुळे परिसरातील नागरिक विशेषत: महिला-मुलींना प्रचंड त्रास वाढला आहे. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी रविवारी मध्यरात्री पोलीस ठाण्याला घेराव घालून आपला रोष व्यक्त केला.
सिरसपेठ परिसरात माता मंदिराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून एका गुन्हेगाराचा दारूचा अड्डा आहे. येथे दारुड्यांची नेहमी वर्दळ असते. त्यांना तेथे बसण्यासाठी चक्क ग्रीन शेड टाकण्यात आले आहे. त्यामुळे दारुडे तेथे दारू पितानाच तेथेच लघवी करतात, ओकाºया करतात अन् भांडणही करतात. येणाºया-जाणाºया महिला-मुलींची छेड काढण्याचे, त्यांना टोमणे मारण्याचे प्रकारही घडतात. दारुड्यांना विरोध केल्यास ते थेट भांडण करून अंगावर चालून येतात. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंबंधाने इमामवाडा पोलिसांना वारंवार माहिती देऊनही पोलीस दखल घेत नाहीत. त्यामुळे दारुड्यांची आणि अड्डाचालकाची गुंडगिरी वाढतच आहे.
रविवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास पंकज चोपकर आणि त्याचा भाऊ मोहर्रमचा जुलूस बघून घराकडे येत होते. दारूच्या अड्ड्याजवळ मोठी गर्दी होती. त्यामुळे पंकज आणि त्याच्या भावाने रस्त्यावर असलेल्या सचिन गिरंतरवार तसेच अन्य आरोपींना रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगितले. त्यावरून वाद वाढला आणि आरोपी सचिन, छोटेलाल रसकेल, सिकंसर रसकेल, राकेश रसकेल, तरुणा रसकेल तसेच रेशमाने आपल्या साथीदारांना बोलवून पंकज, त्याचा भाऊ आणि मध्ये धावत आलेल्या आईला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही धमकी दिली. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. आरोपींची गुंडगिरी आणि त्रास नेहमीचाच असल्यामुळे मोठ्या संख्येत वस्तीतील नागरिक एकत्र झाले आणि त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. दारूचे गुत्ते बंद करा आणि गुंडगिरी करणाºया आरोपींवर कारवाई करा, अशी मागणी करून रात्री १.३० वाजेपर्यंत संतप्त नागरिक इमामवाडा पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करीत होते. तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी पंकजची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कारवाईचा बनाव
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक वर्षांपासून दारूचे गुत्ते, अवैध धंदे सुरू आहेत. नागरिक त्याची वेळोवेळी तक्रारही करतात. मात्र, मोठा हप्ता मिळत असल्यामुळे तक्रार आल्यानंतर पोलीस कारवाईचा देखावा करतात. प्रत्यक्षात कडक कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगार आणि अवैध धंदेवाले चांगलेच निर्ढावले आहेत. यामुळे या भागात पुन्हा मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Outrage against alcoholism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.