ऑरेंज फेस्टिव्हल; कुकिंग स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाच विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:45 AM2019-01-18T10:45:27+5:302019-01-18T10:45:57+5:30

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने नामांकित शेफ गौतम मेहऋषी यांचा कुकिंग वर्कशॉप २१ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात दुपारी १२ ते ३ पर्यंत होणार आहे.

Orange Festival; Five students selected for the primary round | ऑरेंज फेस्टिव्हल; कुकिंग स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाच विद्यार्थ्यांची निवड

ऑरेंज फेस्टिव्हल; कुकिंग स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाच विद्यार्थ्यांची निवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने नामांकित शेफ गौतम मेहऋषी यांचा कुकिंग वर्कशॉप २१ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात दुपारी १२ ते ३ पर्यंत होणार आहे. यात डेझर्ट आणि प्लेटिंगचा समावेश राहील. अंतिम स्पर्धेत विजेत्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ आणि १८ जानेवारीला नागपुरातील विविध हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये होणार आहे. पहिली फेरी १७ रोजी गोधनी येथील तुली कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट येथे प्राथमिक फेरी घेण्यात आली. ७५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात प्रज्ज्वल भीमराव मेश्राम, अंकुश कुंदन बर्मन, संजय भूषण वर्मा, स्नेहा नंदलाल चांडक, गुंजन दिनेश दांडेकर या पाच विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. परीक्षकाची भूमिका संचालिका डॉ. उर्वशी यशोरॉय, प्राचार्य शैलेंद्रकुमार चिकटे आणि सहायक प्राध्यापक प्रज्ञा टेंभुर्णीकर यांनी बजावली.

आज दोन कॉलेजमध्ये प्राथमिक फेरी
कुकिंग स्पर्धेची दुसरी प्राथमिक फेरी १८ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता कडबी चौक, मंगळवारी येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी येथे होणार आहेत. २०० पेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धेत भाग घेणार आहे. तसेच १८ रोजी दुपारी २.३० वाजता सदर येथील बाळासाहेब तिरपुडे कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी स्पर्धेची फेरी होणार आहे. दोन्ही फेरीत प्रत्येक महाविद्यालयातील पाच-पाच विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.

Web Title: Orange Festival; Five students selected for the primary round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.