परीक्षा भवनातील १२० कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:47 PM2018-03-13T23:47:33+5:302018-03-13T23:47:53+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी त्यांना नोटीस जारी केली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारादेखील देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Notice to 120 employees of the examination hall | परीक्षा भवनातील १२० कर्मचाऱ्यांना नोटीस

परीक्षा भवनातील १२० कर्मचाऱ्यांना नोटीस

Next
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ‘बायोमेट्रिक मशीन’ची समस्या सांगणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी त्यांना नोटीस जारी केली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारादेखील देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये ‘बायोमेट्रिक मशीन’ नादुरुस्त अवस्थेत आहेत. याची माहिती डॉ.खटी यांच्यासमवेत इतर अधिकाऱ्यांनादेखील आहे. याअगोदरदेखील यासंदर्भात तक्रारी झाल्या होत्या. मात्र समस्येला दूर करण्याऐवजी डॉ.खटी यांनी आपल्या कक्षाजवळ एक रजिस्टर ठेवले. ज्या कर्मचाऱ्यांनी ‘बायोमेट्रिक’मध्ये हजेरी लावली नाही, त्यांनी रजिस्टरमध्ये हस्ताक्षर करावे, असे सांगण्यात आले. परंतु हस्ताक्षर केल्यानंतरदेखील अनेक कर्मचाऱ्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी परत तक्रार केली तर त्यांना नोटीस देण्यात आली. यासंदर्भात डॉ.नीरज खटी यांना संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
शीतयुद्धाचा फटका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसतो आहे. विभागातील विधीसभेतील एक सदस्य असलेल्या राजेंद्र पाठक यांनी ‘बायोमेट्रिक’च्या दुरुस्तीसंदर्भात कर्मचाऱ्यांकडून हस्ताक्षर घेतले व ते निवेदन डॉ.खटी यांना दिले. यानंतर गोपनीय शाखेचे सहायक उपकुलसचिव मोतीराम तडस यांनी डॉ.खटी यांचा कक्ष गाठला व त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर डॉ.खटी यांनी निवेदनावर हस्ताक्षर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली. आपली समस्या त्यांनी विभागप्रमुखाच्या माध्यमातून का पाठविली नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पाठक यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कर्मचारी नाराज
दरम्यान, डॉ.खटी यांच्या या भूमिकेमुळे कर्मचारी नाराज झाले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. डॉ.खटी गेल्या काही काळापासून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Web Title: Notice to 120 employees of the examination hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.