'भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 08:31 AM2018-05-20T08:31:25+5:302018-05-20T08:31:25+5:30

भाजपासोबत युती करणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र, आमची भाजपासोबत निवडणूकपूर्व नैसर्गिक युती आहे.

'Not a coalition with the BJP but the big split in the Shiv Sena' | 'भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट'

'भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट'

Next

नागपूर -  2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली नाही, तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल, असं भाकित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये केलं.  भाजपासोबत युती करणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र, आमची भाजपासोबत निवडणूकपूर्व नैसर्गिक युती आहे. शिनसेनेने भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. शिवसेना दूर गेली तरी रिपाइं मात्र भाजपासोबतच राहील, असे रिपाइं (आ.) चे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, शिवसेनेचे संजय राऊत, सुभाष देसाई यांच्याशीही आपण याबाबत चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी या मुद्यावर शिवसेनेशी बोलावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब टाकली आहे. ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपाइंशी सर्व समाजांना जोडणार

२७ मे रोजी पुणे येथे रिपाइंचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील काळात दलितांसह ओबीसी, मराठा, मुस्लीम अशा सर्वच समाजातील लोकांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्वांना सोबत घेऊन गावागावात शाखा सुरू केल्या जातील. बाबासाहेबांचा रिपाइं पुढे चालवायचा असेल तर सर्वांना सोबत घेण्यावाचून पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले. दलित व आदिवासी महाामंडळांनी दिलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी पक्षाच्या अधिवेशनात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

रामटेक लोकसभा लढणार
 १९९८ मध्ये आपण दक्षिण-मध्य मुंबईमधून लोकसभेची निवडणूक जिंकलो होतो. या वेळी भाजपा-सेना युती झाली तर पुन्हा त्याच मतदारसंघातून लढण्याचा आपला विचार आहे. मात्र, युती झाली नाही तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. आपण याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी देखील चर्चा केली आहे. मी विदर्भवादी आहे. या मतदारसंघात आपल्याला विरोध होणार नाही. निश्चित विजयी होऊ, असा दवाही त्यांनी केला.

Web Title: 'Not a coalition with the BJP but the big split in the Shiv Sena'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.