‘एनएमआरडीए’चे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:34 AM2019-05-17T10:34:05+5:302019-05-17T10:35:51+5:30

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत.

'NMRDA' Ignore the roads connecting villages | ‘एनएमआरडीए’चे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष

‘एनएमआरडीए’चे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देअपघाताचा धोका वाढला वळणाच्या रस्त्यामुळे रुही, वरोडातील गावकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत. वर्धा मार्गावरील मौजा रुही, शंकरपूर, वरोडा येथील गावकरी ग्रामस्थांना रस्ता नसल्याने महामार्गाच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवत ये-जा करावी लागते. यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एनएमआरडीएची स्थापना ४ मार्च २०१७ ला झाली. या यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील साडेतीन हजार चौरस मीटर परिसरातील ७१९ गावांचा समावेश करण्यात आला. या भागाच्या नियोजनबद्ध विकासाची जबाबदारी आता विकास प्राधिकरण म्हणून एनएमआरडीएची आहे. परंतु दोन वर्षांपासून गावांना मुख्य मार्गावर येण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. वर्धा मार्गावरील मौजा जामठा, गौसी, पांजरी, रुही, शंकरपूर, वरोडा भागात मोठ्या प्रमाणात खासगी गृहनिर्माण योजना, अभिन्यास विक्री सुरू आहे. या भागातून आऊटर रिंग रोड देखील विकसित केला आहे. परंतु या भागातील ही जुनी गावे अजूनही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ (नागपूर ते हैदराबाद)वर येण्यासाठी कच्च्या रस्त्यांचा आणि धोका पत्करून उलट दिशेने वाहने चालवत आहेत. विशेषत: रुही या गवातील नागरिक आऊट रिंग रोडवरील टोल नाक्यापासून ‘यू टर्न’ घेऊन विरुद्ध दिशेने वर्धा मार्गावर येतात. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने अनेकदा अपघात घडतात. नवीन वसाहती पूर्ण झाल्यानंतर या भागातील वर्दळ वाढणार असल्याने परिस्थिती गंभीर होणार आहे.
वास्तविक मेट्रो रिजनच्या विकास आराखड्यानुसार मौजा जामठा येथील छोट्या पुलापासून १८ मीटरचा पांदण रस्ता प्रस्तावित आहे. परंतु या रस्त्यांच्यामध्ये सहारा ग्रुपने संरक्षक भिंत टाकून पांदण रस्ता अडवला आहे. त्यामुळे रुहीच्या गावकऱ्यांना दीड ते दोन कि.मी. वळण घेऊन ये-जा करावी लागत आहे. जबलपूरकडे जाणाºया आऊटर रिंग रोडला दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील लोकांना विरुद्ध दिशेने जावे लागत आहे. सध्या या भागातील टोल नाक्यापासून ‘यू टर्न’ घेत आहेत. येथून जवळच असलेल्या आश्रम ढाब्याच्या दोन्ही बाजूला विकास आराखड्यानुसार १८ मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, परंतु एनएमआरडीचे पांदण रस्ते विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागात गृहनिर्माण प्रकल्प धारकांनी एनएमआरडीएकडे विकास शुल्क भरले आहेत. त्यांनाही जोड रस्ता मिळत नसल्याने त्यांनाही विरुद्ध दिशेने जाण्याशिवाय पर्याय नाही.
प्रस्तावित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
मौजा जामठाच्या (खसरा क्रमांक १३/१) बाजूला पांदण रस्ता प्रस्तावित आहे. तो गौसी व पांजरीपर्यंत प्रस्तावित आहे. हा रस्ता १८ मीटर असून तो पूर्ण झाल्यास येथील नागरिकांचा प्रश्न सुटू शकतो. परंतु प्रस्तावित रस्त्यावर सहारा ग्रुपने संरक्षक भिंत उभारली आहे. ही भिंत हटवण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: 'NMRDA' Ignore the roads connecting villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.