नवजात बालकास उंदरांनी कुरतडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:16 AM2017-08-25T01:16:53+5:302017-08-25T01:17:10+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. रेल्वेस्थानकाच्या पॅसेंजर लाऊंजकडील भागात एका नवजात बालकास उंदीर कुरतडत असताना याच भागात त्या बालकाची माता बेशुद्ध अवस्थेत पडून होती.

 The newborn baby was nervous by the rats | नवजात बालकास उंदरांनी कुरतडले

नवजात बालकास उंदरांनी कुरतडले

Next
ठळक मुद्देरेल्वेस्थानकावरील घटना : माता आढळली बेशुद्धावस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. रेल्वेस्थानकाच्या पॅसेंजर लाऊंजकडील भागात एका नवजात बालकास उंदीर कुरतडत असताना याच भागात त्या बालकाची माता बेशुद्ध अवस्थेत पडून होती. ही घटना पाहूनही आजूबाजूचे प्रवासी मदतीसाठी धावले नाहीत. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानाला याबाबत माहिती पडले. त्यांनी या बालकास उंदरांपासून वाचवून लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने त्याच्या मातेला उपचारासाठी पाठविले.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ९ वाजता आरपीएफला पॅसेंजर लाऊंजच्या एका भागात एका पिशवीत एका नवजात बालकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पॅसेंजर लाऊंजच्या दुसºया भागात एक महिला बेशुद्धावस्थेत पडून होती. आरपीएफ जवानांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता मृत नवजात बालकाच्या शरीराला उंदीर कुरतडत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे आजूबाजूला रक्त जमा झाले होते. जवानांनी तेथून उंदरांना पळवून बाजूला असलेले उंदराचे बिळ बुजवून टाकले. त्यानंतर नवजात बाळाच्या शरीरावर पांढरी चादर टाकण्यात आली. रेल्वेच्या डॉक्टरांनी नवजात बाळाची तपासणी करून त्यास मृत घोषित केले. लोहमार्ग पोलिसांना त्याची सूचना देताच त्यांनी बेशुद्धावस्थेतील महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविले. बेशुद्ध महिलेचे नाव अलका असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या स्थितीवरून गुरुवारी पहाटे ५ वाजता तिने बाळाला जन्म देऊन त्याला एका पिशवीत ठेवून फेकून दिले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रसूती झालेल्या महिलेच्या पायावर रक्ताचे डाग लागल्याचे दिसत होते.
 

Web Title:  The newborn baby was nervous by the rats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.