आजारी समाजाला सुधारण्यासाठी लाखो उल्कांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:04 AM2018-08-22T01:04:20+5:302018-08-22T01:05:31+5:30

संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंगाने महत्त्वाचा आहे. आज समाज विशिष्ट मानसिक आजाराने ग्रस्त होत आहे. या समाजाचा आजार दूर करण्यासाठी लाखो उल्कांची गरज आहे, असे मनोगत ज्येष्ठ कवी, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

The need for millions of Ulka to improve the sick community | आजारी समाजाला सुधारण्यासाठी लाखो उल्कांची गरज

आजारी समाजाला सुधारण्यासाठी लाखो उल्कांची गरज

Next
ठळक मुद्देयशवंत मनोहर : उल्का महाजन यांना ताराबाई शिंदे समाजकार्य पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंगाने महत्त्वाचा आहे. आज समाज विशिष्ट मानसिक आजाराने ग्रस्त होत आहे. या समाजाचा आजार दूर करण्यासाठी लाखो उल्कांची गरज आहे, असे मनोगत ज्येष्ठ कवी, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.
आकांक्षा प्रकाशनतर्फे दिला जाणारा पहिला ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या व ‘कोसळता गावगाडा’ या ऐतिहासिक पुस्तकाच्या लेखिका उल्का महाजन यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रुपाताई कुळकर्णी-बोधी, विलास भोंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना उल्का महाजन यांनी गावापासून सुरू झालेला संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचण्याचा रोमांचक उलगडा केला. वैयक्तिक आयुष्यात प्रचंड हाल सहन करून या लढ्यात सहभागी होत खंबीरपणे सोबत असलेल्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी संघर्षाची गाथा मांडली. रायगड जिल्ह्यात दलित अत्याचाराविरोधापासून लढ्याला सुरुवात झाली. पुढे या भागातील कातकरी आदिवासींच्या समस्या घेऊन वेठबिगारी, अत्याचार, वर्तमान काळातही गावात पाळला जाणारा जातीभेदाच्या समस्यांसह वन हक्कांचे प्रश्नांसाठी लढा वाढत गेला. हा संघर्ष जातीयवाद आणि सरंजामशाहीच्या राहिलेल्या अवशेषांविरोधातील होता, जे आपल्यासमोर आहेत. मात्र यापुढे समोर न दिसणाºया भांडवलदारांविरोधात लढा सुरू झाला. धनदांडगे, मोठमोठ्या कंपन्यांचे भांडवलदार गावगाड्यातील आदिवासी, शेतकरी यांच्या जमिनी पैशांच्या जोरावर बळकावू पाहत आहेत. त्यांच्याविरोधात सामान्य माणसांना घेऊन लढलेला लढा यशस्वी झाला. हाही संघर्ष देशातील धनदांडग्यांच्या विरोधातील होता. मात्र यापुढचा लढा या देशातील जमिनी बळकावू पाहणाºया आंतरराष्टÑीय कंपन्याविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी मार्ग, रेल्वे कॉरिडॉर, सागरीमाला, भारतमाला या मनोहारी नावाने हे षड्यंत्र चालले आहे. गावातील सरंजामांची ताकत स्थानिक व्यवस्था व नेत्यांशी जुळली असते. हा लढा कठीण आहे, कारण या न दिसणाºया भांडवलदारांनी स्थानिक संस्था, पोलीस व्यवस्था, न्यायव्यवस्था, माध्यमे यांनाही गुलाम बनविले असल्याचे वास्तव महाजन यांनी अनेक अनुभवातून मांडले. त्यांच्याच तालावर नाचणारे सरकार सामान्य माणसांच्या हक्काचा आवाज असलेले संविधान व लोकशाही उद्ध्वस्त करण्याची तयारी करीत आहे.
विकासाच्या नावाखाली देशाचा ४० टक्के भूभाग परकीय सत्तांच्या हातात जाणार आहे. हिटलरशाही व फॅसिजम आणू पाहणारे सरकार मदतीला येणार नाही, त्यामुळे या संघर्षात मदतीसाठी समाजाने तातडीने जागे होण्याची गरज असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. रुपाताई कुळकर्णी-बोधी यांनी अध्यक्षीय विचार मांडले. प्रास्ताविक आकांक्षा प्रकाशनच्या अरुणा सबाने यांनी व संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. प्रा. रेखा ठाकरे यांनी आभार मानले.

Web Title: The need for millions of Ulka to improve the sick community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर