नागपूरच्या नंदा पराते यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 07:22 PM2018-09-26T19:22:00+5:302018-09-26T19:23:17+5:30

आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीयअध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते यांनी बुधवारी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Nagpur's Nanda Parate entered the Congress | नागपूरच्या नंदा पराते यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूरच्या नंदा पराते यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देआदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीयअध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते यांनी बुधवारी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कॉँग्रेसच्या मुख्यालयात आदिम समाजाच्या शिष्टमंडळाची राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली. अ‍ॅड. नंदा पराते यांनी हलबांचे अनुसूचित वर्गवारीतील हक्क नाकारले गेल्याने समाजावर ओढवलेल्या संकटाबाबत अवगत केले. कॉँग्रेस हलबा समाजासोबत असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. त्याचवेळी कॉँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी अ‍ॅड. नंदा पराते यांचा कॉँग्रेस पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करून घेतला. राहुल गांधी यांनी अ‍ॅड. पराते यांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काम करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यांच्यासोबत शिष्टमंडळात गीता जळगावकर, राजू नंदनवार, अशोक खांडलीकर, मोरेश्वर निनावे, अभिषेक मोहाडीकर, लोकेश वहीधरे आणि बबलू निनावे यांचा समावेश होता.

 

Web Title: Nagpur's Nanda Parate entered the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.