भय्युजी महाराजांना आवडायचे नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:52 AM2018-06-13T00:52:22+5:302018-06-13T00:52:39+5:30

आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.

Nagpur is very much like Bhaiyuji Maharaj | भय्युजी महाराजांना आवडायचे नागपूर

भय्युजी महाराजांना आवडायचे नागपूर

Next
ठळक मुद्देविविध कार्यक्रमांसाठी नागपुरात आले : निधनामुळे अनुयायांमध्ये शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.
महाराज विशेषकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात येत होते. ते २७ सप्टेंबर २००९ रोजी संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान, त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत शस्त्रपूजा केली होती तसेच प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते. युवाचा उलटा उल्लेख वायू होतो. वायू शुद्ध व पवित्र राहिल्यास राष्ट्र व समाज सुदृढ होईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यापूर्वी १५ फेब्रुवारी २००८ रोजी महाल येथील चिटणीस पार्कमध्ये त्यांचे प्रवचन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या दिनचर्येची माहिती देताना ते केवळ तीन तास निद्रा घेत असल्याचे सांगितले होते. रोज पहाटे ३ वाजतापर्यंत अनुयायांची भेट घेतो व सकाळी ६ वाजता उठून पूजापाठ करतो, अशी माहिती त्यांनी दिली होती. देवावर विश्वास ठेवून कार्य करणाराच यशस्वी होतो. मला एवढी शक्ती कुठून मिळते माहीत नाही. कर्मामुळे विकासाचे मार्ग मोकळे राहतात, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर १० मे २०१२ रोजी ते काही वेळाकरिता नागपुरात आले होते. ८ आॅगस्ट २०१३ रोजी विदर्भ सेवा समितीच्या सन्मान सोहळ्यासाठी तर, २०१५ मध्ये अन्य निमित्ताने ते नागपुरात आले होते.

Web Title: Nagpur is very much like Bhaiyuji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.