नागपुरात कारवाई टाळण्यासाठी मध्यसम्राटाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:22 AM2018-12-28T00:22:09+5:302018-12-28T00:25:26+5:30

मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी सकाळी धंतोली पोलिसांनी धंतोलीतील मद्यसम्राटाकडे केलेल्या कारवाईनंतर बनावट दारू तयार करणा-या मद्यमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई कशी दडपता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून, त्यामुळे आज दिवसभर मद्यमाफियांची नागपुरात धावपळ बघायला मिळाल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला टिप्परचा चालक मालक भलत्याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

In Nagpur to avoid the action, the runway of liquor samrat | नागपुरात कारवाई टाळण्यासाठी मध्यसम्राटाची धावपळ

नागपुरात कारवाई टाळण्यासाठी मध्यसम्राटाची धावपळ

Next
ठळक मुद्देपोलीस आणि अबकारी खात्याकडून स्वतंत्र चौकशी : ठोस कारवाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी सकाळी धंतोली पोलिसांनी धंतोलीतील मद्यसम्राटाकडे केलेल्या कारवाईनंतर बनावट दारू तयार करणा-या मद्यमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई कशी दडपता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून, त्यामुळे आज दिवसभर मद्यमाफियांची नागपुरात धावपळ बघायला मिळाल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला टिप्परचा चालक मालक भलत्याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
राज्यात विक्री आणि पिण्यासाठी प्रतिबंध असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणातील दारू नागपुरात आणायची आणि बनावट रसायन मिसळवून ती दारू ब्राण्डेड मद्य कंपनीच्या बाटल्यात घालून ती सर्रास बार, वाईन शॉपमध्ये विकायला ठेवायची, असा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चित आहे. धंतोली आणि पाचपावलीतून सुरू असलेल्या या गोरखधंद्यात रोज लाखोंची उलाढाल होते आणि त्यातील काही हिस्सा पोलीस तसेच काही हिस्सा अबकारी खात्यातील भ्रष्टाचार-यांना मिळत असल्याने लालावर कारवाई करण्याची तसदी कुणी घेत नाही.
धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे आणि त्यांच्या सहका-यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर धंतोली येथील बाल भारती इमारतीजवळ उभा असलेल्या टिप्पर (एम.एच./३१/सी/क्यू / २६२१९ ) ची संशयावरून तपासणी केली. त्यात देशी दारूच्या २०० पेट्या सापडल्या. टिप्पर चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंथर टिप्परमध्ये जवळच्याच गोदामातून दारूच्या पेट्या ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. ही दारू बनावट असल्याचा संशय आल्याने धंतोली पोलिसांनी अबकारी विभागाला सूचना दिली. अबकारी विभागाच्या मदतीने बुधवारी दुपारी घटनास्थळाजवळच असलेल्या सम्राट एजन्सीच्या गोदामावर धाड टाकण्यात आली. पोलीस व अबकारी विभागाने गोदामाची झडती घेतली. दारूच्या दोन पेट्या, खाली बॉटल आणि झाकणे सापडली. गोदामात सापडलेली दारू हरियाणाची असल्याचे सांगितले गेले. अबकारी विभागाने दारू आणि अन्य सामान जप्त केले. गोदामाजवळच एम.एच./४०/ए/ ८५१५ क्रमांकाचे वाहन सापडले. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहन जप्त केले आहे. तसेच गोदामात उपस्थित असलेल्या विनय जयस्वाल याला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर नागपूर-विदर्भातील मद्यमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी ही कारवाई दडपण्यासाठी बुधवारी दुपारपासून सुरू केली. नागपूरच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि रायपूर, बैतूल, पांढुरणामधील मद्यमाफियाही लालाच्या मदतीसाठी नागपुरात पोहचले. विशेष म्हणजे, परप्रांतातील ही बनावट दारू दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाठविली जाते. त्यामुळे तेथील मद्यमाफियाही नागपुरात धावपळ करीत होते. तिकडे अकबारी खात्याचे अधिकारी आणि ईकडे धंतोली पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
टिप्परचालकाची शोधाशोध
पोलिसांच्या माध्यमातून अकबारी खात्याच्या पथकाने मुन्ना जयस्वलचा भाऊ विनय जयस्वालला अटक केली होती. त्याचा आज एमसीआर झाला. दरम्यान, जयस्वालच्या अनेक दुकानातील व्यवहार आता पोलिसांच्या रडारवर आला असून, अनियमिततेचा ठपका ठेवून काही दुकानांचे परवाने निलंबित करण्यावर विचार केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ज्या टिप्परमध्ये दारू आढळली. त्या टिप्परचालक , मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. टिप्परमधील कागदपत्रात नमूद असलेल्या पत्त्यावर पोलीस पोहचले असता त्यांना तेथे टिप्परमालक आढळला नाही. त्याचा पत्ता शोधण्यात पोलिसांनी आज दिवसभर धावपळ केली रात्रीनंतर काही ठिकाणी पोलीस छापे टाकण्याच्या तयारीत होते.
तो व्हिडीओ कुणी बनविला
अबकारी खात्याच्या तपासात सम्राट एजन्सीचे गोदाम मालक म्हणून अमरिश जयस्वाल हे नाव पुढे आले तर, मद्य व्यवसायात अमरिशचा भाऊ प्रशांत आणि संजीत जयस्वालची भागीदारी असल्याचीही माहिती पुढे आली. त्यामुळे अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थापक विनय तसेच जयस्वाल बंधूविरुद्धही रि बाटलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच दणकेबाज कारवाई झाल्याने हादरलेल्या संबंधित मद्यमाफियांनी नोकरांवर कारवाई व्हावी यासाठी बुधवारी सकाळपासून प्रयत्न चालविले. त्यासाठी पोलीस अबकारी खाते आणि प्रसारमाध्यमाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला. दुपारनंतर मुन्ना जयस्वाल याने एक व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडीओतून जयस्वालने आपले घोंगडे नोकरावर झटकून, नोकरांनी रि बाटलिंगचा प्रयोग केल्याचे म्हटले आहे. जयस्वालला हा व्हिडीओ कुणी बनवून दिला, त्याची चौकशी केल्यास धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: In Nagpur to avoid the action, the runway of liquor samrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.