नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक : ४० जागांसाठी २११ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:13 PM2018-06-25T23:13:50+5:302018-06-25T23:14:46+5:30

वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. २५) शेवटचा दिवस होता. त्यानुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या २१ सदस्यपदासाठी १२८ तर नगराध्यक्षपदासाठी ७ आणि पारशिवनीत १७ सदस्यांसाठी ७१ व नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

Municipal Council, Nagar Panchayat Election: 211 candidates for 40 seats | नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक : ४० जागांसाठी २११ उमेदवार

नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक : ४० जागांसाठी २११ उमेदवार

googlenewsNext
ठळक मुद्देवानाडोंगरीत ३८ जागांसाठी १९९ तर पारशिवनीत ७१ उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. २५) शेवटचा दिवस होता. त्यानुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या २१ सदस्यपदासाठी १२८ तर नगराध्यक्षपदासाठी ७ आणि पारशिवनीत १७ सदस्यांसाठी ७१ व नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यातील काही उमेदवार निवडणूक रिंगणातून मागे हटण्याची शक्यता असून २ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये घमासान होणार आहे.
वानाडोंगरी आणि पारशिवनी ग्रामपंचायतला दर्जा वाढ मिळाल्यानंतर १५ जुलैला पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज झाला असून यामध्ये विशेषत: स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोबतच माजी आमदारांना या निवडणुकीच्या निमित्ताने ताकद दाखविण्याची संधी आहे.
वानाडोंगरी नगर परिषदेतील १० प्रभागातून २१ सदस्यपदासाठी १२८ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे. सोबतच नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी निवडणूक रिंगणात उतरले आहे. यामध्ये सर्वाधिक ११ उमेदवार हे प्रभाग १ ब मध्ये आहे. तर सर्वात कमी ४ उमेदवार हे चार प्रभागात आहेत. यामध्ये प्रभाग २ ब, प्रभाग ३ अ, प्रभाग ५ अ, प्रभाग ७ अ चा समावेश आहे.
पारशिवनी नगर पंचायतमध्ये १७ सदस्यपदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. येथे सर्वच वॉर्डात साधारणत: ३, ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. केवळ प्रभाग १५ मध्ये तब्बल १० उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज सादर केले आहे. उमेदवारी अर्ज २ जुलैपर्यंत परत घेता येणार आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सध्यातरी सर्वच उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. वानाडोंगरी नगर परिषदेत भाजप विरुद्ध राष्टÑवादी काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे.
एक दृष्टिक्षेप
वानाडोंगरी नगर परिषदेत प्रभाग १ अ मधून ७ व ब मधून ११, प्रभाग २ अ मधून ६ व ब मधून ४, प्रभाग ३ अ मधून ४ व ब मधून ७, प्रभाग ४ अ मधून ५ व ब मधून ६, प्रभाग ६ अ मधून ६ व ब मधून ६, प्रभाग ७ अ मधून ४ व ब मधून ६, प्रभाग ८ अ मधून ५, ब मधून ५ व क मधून ६, प्रभाग ९ मधून ६ व ब मधून ७ तर प्रभाग १० अ मधून ८ व ब मधून ८ उमेदवारांनी अर्ज सादर केला. पारशिवनी नगर पंचायतमध्ये वॉर्ड क्र. १, २, ४, ५, ७, ११, १२, १३, १४ मधून प्रत्येकी ४, वॉर्ड क्र. ३, १६ मधून प्रत्येकी ५, ३ वॉर्ड क्र. ६, ८, ९, १०, १७ प्रत्येकी ३ तर वॉर्ड क्र. १५ मध्ये १० उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
वानाडोंगरी नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदासाठी शीला डाखळे, वर्षा शहाकार, रचना कन्हेर, हेमलता गिरडकर, नंदा दुपारे, वंदना जोध आणि उषा बोदिले यांनी प्रत्येकी एक असे एकूण सात अर्ज सादर केले आहेत. पारशिवनीत सुनीता डोमकी, माधुरी बावनकुळे, प्रतिभा कुंभलकर यांच्यासह रुबीना बाघाडे यांनी दोन अर्ज दाखल केले. यामुळे येथे पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

Web Title: Municipal Council, Nagar Panchayat Election: 211 candidates for 40 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.