नागपुरात  दोन लाखावर रुग्णांची मलेरिया तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 08:58 PM2019-10-05T20:58:44+5:302019-10-05T21:01:43+5:30

जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मलेरियाच्या निदानासाठी १ लाख ८७हजार ५११ रक्त नुमने घेण्यात आले. यात डेंग्यूचे ४९० रुग्ण आढळले असून त्यातील २०९ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाल्याची माहिती हत्तीरोग व हिवताप रोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. .

Malaria testing of two lakh patients in Nagpur |  नागपुरात  दोन लाखावर रुग्णांची मलेरिया तपासणी

 नागपुरात  दोन लाखावर रुग्णांची मलेरिया तपासणी

Next
ठळक मुद्देडेंग्यूपासून बचावासाठी मलेरिया विभागाच्या सूचना : कुलर, प्लॉवरपॉटचे पाणी काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ज्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळून येतात, त्या घरातील व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेतले जातात. डेंग्यूचे निदान करण्याच्या दृष्टीने रक्त तपासणी केली जाते. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मलेरियाच्या निदानासाठी १ लाख ८७हजार ५११ रक्त नुमने घेण्यात आले. यात डेंग्यूचे ४९० रुग्ण आढळले असून त्यातील २०९ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाल्याची माहिती हत्तीरोग व हिवताप रोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. .
जानेवारी महिन्यात २०,०४७, फेब्रुवारीत २४,०४८, मार्च महिन्यात १९,९१८, एप्रिल मध्ये ८,४३५, मे महिन्यात १९,९१८, जून १७,२३९, जुलै २५,५६९, ऑगस्ट महिन्यात २९,४६७ तर सप्टेंबर मध्ये ७,१७४ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. मलेरियाने कुणीही दगावला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
घरात बंद असलेल्या कुलरमध्ये पाणी असेल, फ्लॉवर पॉटमधील पाणी दररोज बदलवित नसाल, आजूबाजूला पडलेल्या टायरमध्ये पाणी साचले असेल तर अशा ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते. खबरदारी म्हणून नागरिकांनी अशा ठिकाणचे पाणी वेळोवेळी काढावे, असे आवाहन मलेरिया विभागाने केले आहे.
डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यात तयार होतो. त्याची पैदास साठवून असलेल्या स्वच्छ पाण्यात गतीने होते. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी स्वच्छ पाणी एक दिवसापेक्षा अधिक वेळ जमा ठेवू नका. घरात लावलेल्या कुलरचा सध्या उपयोग नसेल तर त्यातील पाणी काढून ते कोरडे करा, घरातील फ्लॉवर पॉटमधील पाणी दररोज बदलवण्याचे आवाहन जयश्री थोटे यांनी केले आहे.
मलेरिया, हत्तीरोग विभागातर्फे वेळोवेळी सर्वेक्षण करून डेंग्य डासांच्या पैदासीवर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जातो. विभागाचे ७८७ कर्मचारी शहरात कार्यरत आहे. डास उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. नागरिकांनी घरातील डास उत्पत्तीच्या संभाव्य जागा कोरड्या ठेवण्याचे आवाहन केले आहे.
फायलेरियासाठी ६२३४४ रुग्णांची तपासणी
फायलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलेरिया विभागातर्फे दरवर्षी गोळ्यांचे वाटप करण्यात येते. तरीही ज्या भागात फायलेरिया रुग्ण आढळले जाऊ शकतात, अशा परिसरातील सुमारे ६२,२४४ रुग्णांची स्लाईड तपासणी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली.

Web Title: Malaria testing of two lakh patients in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.