देशात सर्वाधिक रोजगाराची संधी महाराष्ट्रात : मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 08:43 PM2019-01-04T20:43:27+5:302019-01-04T20:45:12+5:30

देशात सर्व राज्यांमधून महाराष्ट्रात सर्वात मोठी रोजगाराची संधी असल्याचे इपीएफओच्या ऑनलाईन अकाऊंट नोंदणीवरुन लक्षात आले आहे. कारण देशभरात इपीएफओच्या अकांऊंटची संख्या ८० लाख असून, त्यातील २५ टक्के अकाऊंट हे एकट्या महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांचे असल्याचे नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या काही काळात राज्यातील तीन लाख तरुणांना कौशल्य विकासातून रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवक रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करताना म्हणाले.

Maharashtra's highest employment opportunity in country : Chief Minister Phadanvis | देशात सर्वाधिक रोजगाराची संधी महाराष्ट्रात : मुख्यमंत्री फडणवीस

देशात सर्वाधिक रोजगाराची संधी महाराष्ट्रात : मुख्यमंत्री फडणवीस

googlenewsNext
ठळक मुद्देयुवक रोजगार मेळाव्याचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात सर्व राज्यांमधून महाराष्ट्रात सर्वात मोठी रोजगाराची संधी असल्याचे इपीएफओच्या ऑनलाईन अकाऊंट नोंदणीवरुन लक्षात आले आहे. कारण देशभरात इपीएफओच्या अकांऊंटची संख्या ८० लाख असून, त्यातील २५ टक्के अकाऊंट हे एकट्या महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांचे असल्याचे नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या काही काळात राज्यातील तीन लाख तरुणांना कौशल्य विकासातून रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत, असे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस युवक रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करताना म्हणाले.
विदर्भात नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणात असून, येथे नवनवीन उद्योग उभारणीला आवश्यक तो कच्चा माल मोठ्या प्रमाणात असल्याचे रोजगार वाढीस अनुकूल वातावरण आहे. उद्योग उभारणीसाठी ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी स्वस्त वीज देण्यासाठी डिफरेन्शियल टँरीफ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विदर्भात सर्वात कमी दराने वीज उपलब्ध करुन दिल्यामुळे उद्योग येत आहेत. त्यामुळे येथे रोजगाराची सर्वात मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भारत हा युवकांचा देश असून, सध्या भारतीय लोकसंख्येचे सरासरी वयोमान २७ वर्षे असून, त्यांना रोजगार दिल्यास हीच लोकसंख्या देशाच्या विकासाची गती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
२१ हजार मुलामुलींचे मुलाखतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन
यावेळी आ. अनिल सोले यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, यूथ एम्पॉवरमेंट समिटला पाच वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा जवळपास २१ हजार मुलामुलींनी मुलाखतीसाठीआॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील १०६ कंपन्या सहभागी झाल्या असून, त्यात नागपूरच्या ४४ कंपन्याचा सहभाग असल्याचे सांगितले. या मेळाव्यातून एअर इंडियासह विविध एअरलाईन्स कंपन्यामध्ये १९३ मुलांना रोजगार मिळाला असल्याचे सांगितले. येत्या तीन दिवसात२२ सेमिनार होणार असून, आतापर्यंत अडीच हजार युवकांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आजचे छोटे पाऊल तरुणांना प्रगतीची वाट दाखवेल - सुधीर मुनगंटीवार
रोजगार हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. देशाची प्रगती करायची असेल तर येथील तरुणांच्या क्रयशक्तीचा योग्य उपयोग होणे आवश्यक आहे. देशातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आणल्या आहेत. याशिवाय राज्यातही विविध योजनांद्वारे तरुणांचे सक्षमीकरण केले जात आहे. आज नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे होणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ‘यूथ एम्पॉवरमेंट समीट’ हे तरुणांना रोजगाराची वाट दाखविणारे आजचे छोटेसे पाऊल आहे. पुढे हेच पाऊल संपूर्ण राज्यातील तरुणांना प्रगतीची वाट दाखविणारे ठरेल, असे मत यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Maharashtra's highest employment opportunity in country : Chief Minister Phadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.