लोकमतचे पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पुरस्कार २०१६-१७ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:05 AM2018-02-12T10:05:09+5:302018-02-12T10:06:46+5:30

लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

Lokmat p.v. Gadgil and Baba Dalvi Memorial Award announced for 2016-17 | लोकमतचे पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पुरस्कार २०१६-१७ जाहीर

लोकमतचे पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी स्मृती पुरस्कार २०१६-१७ जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देधुळ्याचे संजय झेंडे व अकोल्याचे अनिल गवई यांना प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे- पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा-वर्ष २०१६- १७ प्रथम- संजय श्रीराम झेंडे, धुळे (रुरबन वसाहतीचे जनक, जलसंवाद); द्वितीय-वंदना विजय धर्माधिकारी, पुणे (अर्थसाक्षरता; विशेषत्वाने महिलांची, लोकसत्ता); तृतीय- राजू नायक, गोवा (खाणींचे मालक कोण? लोकमत).
बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा-वर्ष २०१६-१७- प्रथम- अनिल गवई, अकोला (खामगावात २० टन तांदूळ पकडला, लोकमत); द्वितीय- प्रताप ज्ञानू महाडिक, सांगली (टेंभू योजना दशा आणि दिशा, लोकमत); तृतीय- विश्वास पाटील, कोल्हापूर (अण्णासाहेब पाटील महामंडळाचा घोटाळा, लोकमत)
या पुरस्कार स्पर्धेतील आर्थिक-विकासात्मक लेखन गटाकरिता आलेल्या प्रवेशिकांमधून ४३ प्रवेशिका स्पर्धेकरिता पात्र ठरल्या. शोधपत्रकारिता गटाकरिता आलेल्या प्रवेशिकांमधून ३० प्रवेशिका पात्र ठरल्या. दोन्ही गटांच्या पात्र प्रवेशिकांमधून तीन-तीन विजेत्यांची निवड करण्यात आली.
पुरस्कारांचे स्वरुप, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी व ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठीचे गाढे अभ्यासक प्रमोद मुनघाटे यांनी काम पाहिले. २०१६ व २०१७ या दोन्ही वर्षांकरिता घोषित झालेल्या पुरस्कारविजेत्यांना एका संयुक्त कार्यक्रमात पुरस्कार वितरण केले जाईल. या कार्यक्रमाची माहिती लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमधून लवकरच जाहीर करण्यात येईल.

Web Title: Lokmat p.v. Gadgil and Baba Dalvi Memorial Award announced for 2016-17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.