कालिदास महोत्सव: श्रवणानंदासह आत्मिक आनंद देणारी सांस्कृतिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:02 AM2018-11-28T00:02:47+5:302018-11-28T00:27:12+5:30

केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.

Kalidas Festival: A cultural feast giving spiritual joy with Shravanananda | कालिदास महोत्सव: श्रवणानंदासह आत्मिक आनंद देणारी सांस्कृतिक मेजवानी

कालिदास महोत्सव: श्रवणानंदासह आत्मिक आनंद देणारी सांस्कृतिक मेजवानी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा संदेश : अप्रतिम सादरीकरणाने कालिदास महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ रामटेक व नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भाची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या कालिदास समारोहाला मंगळवारी अद्भूत, अविस्मरणीय अशा सादरीकरणाने सुरुवात झाली. उद्घाटनाला उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करताना रसिकांना या अनोख्या पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. कालिदास महोत्सव हा नवनिर्मिती व परंपरेचा सुंदर संगम व नवा आविष्कार आहे. हा केवळ श्रवणानंद देणारा सोहळा नव्हे तर आत्मिक आनंद देणारी मेजवानी होय, अशी भावना त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली.
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संत्रानगरी ही सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येत आहे. दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवाने विदर्भाचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होत असून, पर्यटनाचे केंद्र म्हणून अधिक मजबुतीने स्थापित होत असल्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. सुधाकर कोहळे यांनी सांगितले, कवी कालिदास यांनी संस्कृतमधून अनेक अविस्मरणीय रचनांचा वारसा आपल्यासाठी ठेवला आहे. महोत्सवातील नृत्य व गायनाचे सादरीकरण म्हणजे या महान रचनाकाराला अभिवादन होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नंदा जिचकार व निशा सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कालिदास यांच्या वेगवेगळ्या रचनांवर आधारित संकल्पनांवर दरवर्षी कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. 

त्यानंतर लेडी झाकीर हुसेन म्हणून प्रसिद्ध जगविख्यात तबलावादक अनुराधा पाल यांच्या तालवाद्य वृंदाचे अप्रतिम सादरीकरण झाले. अंतिम टप्प्यात मलमली स्वरांच्या शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या स्वरांची जादू रसिकांना अनुभवायला मिळाली. श्रवणानंदाचा आविष्कार अनुभवताना पहिल्याच दिवशी नागपूरकर श्रोते न्हाऊन निघाले.

माडखोलकर यांचे ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ 
 महोत्सवाची सुरुवात करण्याचा मान नागपूरच्या भरतनाट्यम् नृत्यांगना व गुरू श्रीमती माडखोलकर यांना मिळाला. कालिदासांच्या सर्वश्रेष्ठ अशा ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या महाकाव्यावर आधारित दृकश्राव्य आनंददायी शास्त्रीय नृत्य त्यांनी अप्रतिमपणे सादर केले. 
 कण्व ऋषींची सौंदर्यवती कन्या शकुंतला व राजा दुष्यंत यांच्या प्रथम भेटीतून निर्माण झालेले प्रेम, त्यांची आसक्ती. शकुंतलेच्या या आसक्तीमुळे ओढवलेला ऋषीचा रोष व त्यांच्या शापामुळे दैववश झालेली दोघांची ताटातूट व शापमुक्तीनंतर शकुंतला व राजा दुष्यंत यांचे आनंददायी पुनर्मिलन अशा पार्श्वभूमीचे हे महाकाव्य. खरंतर ४०० श्लोकांचे हे महाकाव्य सादरीकरणास तीन तासांच्यावर वेळ लागतो. मात्र त्यास लहान करून श्रीमती यांच्या कसदार सादरीकरणाने ते अतिशय प्रभावी ठरले. भरतनाट्यम्मध्ये भावमुद्रा व त्यानुसार पडणाऱ्या पदलालित्याचा संगम महत्त्वाचा असतो. भावमुद्रांमधून महाकाव्याचे कथानक अधोरेखित करण्याचे कसब त्या नृत्यांगनावर असते. श्रीमती यांनी ते सुंदरपणे सादर केली. कथानकातील शृंगार रसाची उत्कटता, तारुण्य सुलभ प्रीती, भावनांचे चित्रण, धीरोदात्त शकुंतलेचा स्वाभिमान, कणखरता अशा गुणांना श्रीमती यांनी त्यांच्या मुद्रांमधून चित्रित केले. डौलदार पदन्यास व त्यांच्यातील कसदार अभिनय क्षमतेमुळे त्यांचे सादरीकरण लक्षणीय ठरले. त्यांच्यासोबत गायक शिवप्रसाद, मृदंगम्वर के.एम. व्यंकटेश्वरम, व्हायोलिनवर शिरीष भालेराव व तालवाद्यावर बकुळ शावदे यांनी साथसंगत केली.

Web Title: Kalidas Festival: A cultural feast giving spiritual joy with Shravanananda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.