तडीपार आणि फरार गुंडांची हत्या, नागपूरमधील खरबी चौकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:47 PM2017-12-19T16:47:15+5:302017-12-19T18:31:10+5:30

सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यानच नागपूरात एका तडीपार आणि फरार गुंडांची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामुष्की ओढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Kadipar and murder of absconding gangs, Kharbi Chowk incident in Nagpur | तडीपार आणि फरार गुंडांची हत्या, नागपूरमधील खरबी चौकातील घटना

तडीपार आणि फरार गुंडांची हत्या, नागपूरमधील खरबी चौकातील घटना

googlenewsNext

नागपूर : सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यानच नागपूरात एका तडीपार आणि फरार गुंडांची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास घडली. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामुष्की ओढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरातील खरबी चौकाजवळील लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ दोन कुख्यात गुंडांची हत्या करण्यात आली.भुऱ्या उर्फ संजय कदोई बनोदे (वय ४०, रा. पांढराबोडी), बादल संजय शंभरकर (वय २६, रा. कुंजीपेठ) अशी मृतांची नावे आहेत. तर, राजेश हनुमंत यादव (वय ४५, रा. बाजारगाव) असे गंभीर जखमी असलेल्याचे नाव आहे.
संजय बनोदे हा खतरनाक गुंड होता. दोन वर्षांपुर्वीपर्यंत तो पांढराबोडीतील खतरनाक गुंड भुऱ्या उर्फ सेवक मसरामचा साथीदार म्हणून ओळखला जायचा. अलिकडे या दोघांमधून विस्तव जात नव्हता. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले होते. या पार्श्वभूमीवर, संजय त्याचा गुंड साथीदार बादल शंभरकर आणि राजेश यादव यांच्यासोबत स्प्लेंडरवर बसून खरबी चौकातून मंगळवारी पहाटे पारडीकडे जात होता. त्याच्या मागावर असलेले गुंड स्वीफ्ट कार (एमएच ४०/ एआर ५७२२)मधून त्यांचा पाठलाग करीत होते. खरबी चौकातून १०० मिटर अंतरावर लक्ष्मी भोजनालयाजवळ आरोपींनी भुऱ्याच्या स्प्लेंडरला जोरदार धडक मारली. त्यामुळे ते भुऱ्या, बादल आणि राजेश तिघेही खाली पडले. त्यांना फारसा मार लागला नसल्याने ते उठून उभे झाले. ते पाहून कारमधून चार गुंड उतरले. त्यातील दोघांनी लोखंडी रॉडने भुऱ्या आणि त्याच्या साथीदारांवर जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर फटके पडल्याने तिघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. त्यानंतर आरोपी दुसऱ्या वाहनाने पळून गेले.
दरम्यान, बादल शंभरकर आणि संजय बानोदे यांची हत्या गॅंगवॉमधून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. 

Web Title: Kadipar and murder of absconding gangs, Kharbi Chowk incident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.