न्याय मिळाला पण २२ वर्षांपासून अंमलबजावणीची प्रतिक्षा; नागपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:15 AM2018-02-16T11:15:36+5:302018-02-16T11:18:20+5:30

गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

Justice got justice but wait for implementation for 22 years; Question mark on Nagpur Municipal Corporation | न्याय मिळाला पण २२ वर्षांपासून अंमलबजावणीची प्रतिक्षा; नागपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

न्याय मिळाला पण २२ वर्षांपासून अंमलबजावणीची प्रतिक्षा; नागपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देमनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हन्यायालयाच्या निर्णयानंतरही अतिक्रमण कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील नवाबपुरा येथील निवासी मन्सूर शरीफ शेख इब्राहीम १९९५साली काही महिन्यासाठी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या मालकीच्या ४५० चौरस फूट जागेवर शेजाऱ्याने अतिक्रमण केले. त्यावेळी मन्सूर इब्राहीम ४४ वर्षांचे होते. आज त्यांचे वय ६६ वर्षे झाले तरीही महापालिक ा मुख्यालय व गांधीबाग झोनमध्ये चकरा मारत आहे. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.
मुख्यमंत्री, नगर विकास विभागाला निवेदने दिली. परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही. आजही अतिक्रमण कायम आहे. न्याय मिळेल अशा आशेने गुरुवारी त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊ न अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.
लोकमतशी चर्चा करताना मन्सूर इब्राहीम म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका आयुक्त, झोनचे सहायक आयुक्त, महापौर यांना वेळोवेळी निवेदने दिली. पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली. परंतु शेजारी घनश्याम नाकाडे यांनी केलेले अतिक्रमण हटविले नाही.
२७ नोव्हेंबर १९९५ रोजी महापालिकेच्या प्रवर्तन विभागाचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी आले होते. परंतु पथक कारवाई न करताच परतले. त्यानंतर पुन्हा तक्रार केली. ३ जानेवारी १९९६ रोजी दुसऱ्यांदा पथक आले. परंतु अतिक्रमण हटविले नाही. प्रवर्तन विभागाने २००४ मध्ये शिडी तोडण्याचे आदेश काढले.
पण ही फाईल वेगवेगळ्या विभागात २०१० पर्यत फिरत होती. १९जानेवारी २०११ रोजी पुन्हा पथक आले. पण कारवाई न करताच पथक परतले. कारवाई करण्यासाठी अनेकदा पथक आले. परंतु अतिकमण न हटविता पथक प्रत्येकवेळी माघारी परतल्याची माहिती इब्राहीम यांनी दिली.

न्यायालयाच्या निर्देशानंतरही कारवाई नाही
महापालिकेकडून न्याय मिळत नसल्याने इब्राहीम यांनी न्यायालयात धाव घेतली. ३० जुलै २०१५ रोजी न्यायालयाने महापालिका प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

भटकंती करून थकलो
गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

Web Title: Justice got justice but wait for implementation for 22 years; Question mark on Nagpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.