नागपुरात आजपासून ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:46 AM2020-09-19T00:46:09+5:302020-09-19T00:47:59+5:30
नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. परंतु मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जनता कर्फ्यूबाबत मनपातर्फे कुठलेही अधिकृत आदेश काढण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर जनता कर्फ्यूबाबत वेगवेगळे वक्तव्य जारी होत आहेत. अशा परिस्थितीत १९ व २० सप्टेंबर रोजी लावण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यूमध्ये नागरिक किती स्वेच्छेने सहभागी होतात हे येणारी वेळच स्पष्ट करेल.
सूत्रानुसार वाढते संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाशी संघर्ष करणाºया कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही थोडा दिलासा देण्याच्या उद्देशाने जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिक जर घरात राहिले तर त्यांना थोडाफार दिलासा मिळेल. अनेक व्यापारी संघटनांनीही महापौरांना पत्र लिहून जनता कर्फ्यूसाठी समर्थन दिले आहे. त्यामुळे हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होणार नाही
जनता कर्फ्यू दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांना कुठलीही अडचण होणार नाही. त्यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. महापौर जोशी यांनीसुद्धा स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. लोक्रतिनिधींनीही नागरिकांना प्रेरित करण्यासाठी पुढे यावे.
दुकाने-प्रतिष्ठाने उघडल्यास दंड होणार - महापौर
जनता कर्फ्यू दरम्यान जर कुणी आपली प्रतिष्ठाने, दुकान, कार्यालय सुरु ठेवले तर त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार महापौरांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. तेव्हा न्यूसेंस डिटेक्श्न स्क्वॉड (एनडीएस)तर्फे कारवाई सुद्धा केली जाईल. जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींच्या सहमतीने घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी कुटुंबासाठी, परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी जनता कर्फ्यूमध्ये सामील व्हा. जनता कर्फ्यूचा अर्थ नागरिकांनी स्वत:हून आपली प्रतिष्ठाने, दुकाने, कार्यालय आदी बंद ठेवणे होय. जेणेकरून संसर्ग रोखता येईल. दोन दिवस बंद राहील तर संक्रमणावर ब्रेक लागेल.
व्हायरल मॅसेज- महाराष्ट्र सरकारचा कर्फ्यू नाही
सोशल मीडियावर शुक्रवारी एक मॅसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यात मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री यांचे फोटो लावलेले होते. यात लिहिले होते की, कृपया भ्रमित होऊ नका, महाराष्ट्र सरकारने नागपुरात शनिवारी व रविवारी कुठल्याही प्रकारचा कर्फ्यू लावलेला नाही. जर कुणी आपले दुकान, प्रतिष्ठान बंद करायला आले तर आपल्या कॅमेºयाने त्याचे फोटो घ्या. तातडीने पोलीस कंट्रोल ररुम मध्ये १०० नंबरवर फोन लावा.
कुठलाही आदेश काढलेला नाही, स्वेच्छेने व्हा सामील - आयुक्त
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी टिष्ट्वट करून सांगितले की, शनिवारी व रविवारी लागणाºया जनता कर्फ्यूबाबत अनेक फोन आले आहेत. परंतु जनता कर्फ्यूबाबत अधिकृतरीत्या कुठलाही आदेश महापालिकेतर्फे काढण्यात आलेला नाही. नागरिक यात स्वेच्छेने सामील होऊ शकतात. विनाकारण कुणीही घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर राखावे, ही काळाची गरज आहे.