नागपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 08:14 PM2019-02-26T20:14:51+5:302019-02-26T20:16:06+5:30

भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारच्या पहाटे एअर स्ट्राईक करून आतंकवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. वायुसेनेच्या कामगिरीचे नागपुरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. देशभक्तीची लाट यानिमित्ताने पुन्हा बघायला मिळत आहे. भारतीय सेनेला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी सर्वत्र जल्लोष साजरा केला.

Jallosh about Air strikes in Nagpur | नागपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष

नागपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष

Next
ठळक मुद्देसर्वत्र दिसला देशभक्तीचा हुंकार : फटाके फुटले, पेढेही वाटले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारच्या पहाटे एअर स्ट्राईक करून आतंकवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. वायुसेनेच्या कामगिरीचे नागपुरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. देशभक्तीची लाट यानिमित्ताने पुन्हा बघायला मिळत आहे. भारतीय सेनेला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी सर्वत्र जल्लोष साजरा केला.
नागपूर महानगरपालिकेत तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत, भारत माता की जयचा जयघोष केला. मनपाच्या टाऊन हॉल परिसरात नगरसेवकांनी हातात भारतीय तिरंगा घेऊन, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पंचशील चौकात आनंदउत्सव साजरा केला गेला. यावेळी देशभक्तीच्या नाऱ्यांनी परिसर दुमदुमला होता. यावेळी फटाक्यांची आतिशबाजी सुद्धा करण्यात आली. त्याचबरोबर विविध संस्था, संघटनांनी वायुसेनेच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. मिठाई वाटून त्यांनी आनंद साजरा केला. सेनेतल्या निवृत्त सैनिकांनी ‘नाऊ द जोश इज हाय’ अशा भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर सुद्धा वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक झाले. अभिनेते राजकुमार यांचा पाकिस्तानवरील ‘डॉयलॉग’ भलताच व्हायरल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचासुद्धा गौरव सोशल मीडियावर झाला. सामान्य जनतेकडून या कामगिरीवर भरभरून प्रतिक्रिया उमटल्या.

Web Title: Jallosh about Air strikes in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.