नागपुरात जय श्रीरामाच्या गजरात रावणाचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 08:52 PM2019-10-09T20:52:37+5:302019-10-09T20:58:42+5:30
नागपुरात रावण दहनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . ३९ ठिकाणी रावण दहन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पौराणिक काळात श्रीरामाने रावणाचा वध केला होता. तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. आजही देशभरात विजयादशमीला रावणाचे दहन करून ती उत्साहात साजरी केली जाते. नागपुरात रावण दहनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सनातन धर्म युवक सभेतर्फे गेल्या ६८ वर्षांपासून रावण दहनाचा कार्यक्रम सातत्याने होत आहे. आजच्या घडीला शहरातील ३९ ठिकाणी रावण दहन उत्सव म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त रामलीला सादर केली जाते. प्रभू श्रीराम, सीता, हनुमानाच्या वेशभूषा बच्चेकंपनीकडून केल्या जातात. जय श्रीरामाचा गजर केला जातो. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.
सनातन धर्म युवक सभा
सनातन धर्म युवक सभेतर्फे ६८ वा रावणदहन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कस्तूरचंद पार्कवर भव्य रावण, मेघनाथ व कुंभकर्णाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. दुपारी ४ पासून रावण दहनाच्या विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी रामलीला सादर करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण झाले. भव्य आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार परिणय फुके, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, संदीप जोशी, अजय संचेती, मितेश भांगडिया, सुनील अग्रवाल, दयाशंकर तिवारी, निशांत गांधी, संजय बुर्रेवार, राजेश लोहिया, सुरेश मेहरा, ऊर्मिला अग्रवाल, प्राणनाथ साहनी, संजीव कपूर, गोपाल साहनी, विजय खेर आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण सोशल फोरम
यशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग १६ पूर्व समर्थनगर येथील महापालिकेच्या मैदानात रावण दहन उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेतर्फे गेल्या २४ वर्षांपासून रावण दहनाचे आयोजन करण्यात येते. रावण दहनासाठी हेमराज बिनावार यांनी ४० फूट उंच रावणाची प्रतिकृती तयार केली होती. धोंडीबाजी परसराम करवटकर यांच्याकडून फटाक्यांचा नेत्रदीपक शो करण्यात आला. कार्यक्रम प्रमुख दिलीप पनकुले यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला बघण्यासाठी २५ हजारावर नागरिक उपस्थित झाले होते. याप्रसंगी संजीवनी चौधरी निर्मित रामलीला सादर करण्यात आली. कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, आमदार सागर मेघे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, अशोक मानकर, सुनील रायसोनी, राजू अग्रवाल, विकास पिंचा, मिकी अरोरा, देवीलाल जयस्वाल, गिरीश पांडव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात संग्राम पनकुले, प्रा. देविदास घोडे, तात्यासाहेब मते, मधुकर भावसार, महादेवराव फुके, सोपानराव शिरसाट, विक्रांत तांबे, संजय शेवाळे, श्रीनिवास दुबे, प्रा. बबलू चौहान, योगेश चौधरी, वसंत घटाटे, प्रमोद वानकर, सरदार रवींद्रसिंग मुल्ला, चेतन मस्के, विलास पोटफोडे, सूरज बोरकर, गीतेश चरडे आदींचे सहकार्य लाभले.
रावणदहन आयोजन समिती, चिटणीस पार्क
महालातील चिटणीस पार्कवर रावणदहन आयोजन समितीतर्फे रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम मालू, विशेष अतिथी म्हणून नगरसेवक दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे, विद्या कन्हेरे, सरला नायक उपस्थित होते. यावेळी राधेश्याम सारडा व रमेश मंत्री यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान भव्य फटाका शो झाला, नंतर रावणदहन करण्यात आले. आयोजनात राजेश कन्हेरे, धीरज चव्हाण, बंडू राऊत, दीपांशू लिंगायत, सचिन सावरकर, आशिष चिटणवीस, शैलेश शुक्ला, रूपेश रामटेककर, बिरजू अरमरकर, अंकुश थेरे, राहुल जैन, अथर्व त्रिवेदी, राहुल खंगार, हरीश महाजन, सुबोध आचार्य, संजय शहापूरकर, नवीन गायकवाड, संजय चिंचोळे, जितू ठाकूर, राजेंद्र जोशी, बाळू बांते, श्याम चांदेकर, अमोल ठाकरे, विजय रेहपाडे, सचिन नाईक, कमलेश नायक, किशोर हरदास, संतोष मिश्रा, रवींद्र सालोखे, सागर रहाटे, बंटी वारे, प्रफुल्ल नाईक, गुड्डू यादव, रोशन रहाटे आदींचे सहकार्य लाभले.
नवज्योती क्रीडा मंडळ
मंडळातर्फे गणेशनगर, शिवनगर, राजीव गांधी पार्क येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक प्रशांत धवड यांच्या मार्गदर्शनात १६ वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला गिरीश पांडव, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, नगरसेवक संजय महाकाळकर, योगेश तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. क्रिष्णा गुप्ता यांनी फटाका शो सादर करून सर्वांना आकर्षित केले. आयोजनात राजू खोपडे, राजू तिवारी, नितीन माटे, दीपक गुर्वे, शिरीष लड्ढा, उल्हास कामुने, संजय रणदिवे, किरण बोरकर, डॉ. तुरणकर, राजू बांते, एकनाथ काळमेघ, मारोतराव ठाकरे, प्रवीण भोयर, रघुवीर ठाकूर, राजू लांबट, प्रशांत आस्कर, किशोर गीते, राहुल जैस्वाल, अवि वराडे, गुरू ताम्रकार, शुभम राऊत, रूपेश घिये, शुभम रणदिवे, संकेत हांडे, कुणाल कडू, प्रणय बोरकर, सोहम राऊत, नयन काळे, अभिनव काळे, हेमांशु भोयर, गोलू ठाकरे आदी उपस्थित होते. आभार एकनाथ काळमेघ यांनी मानले.